Nepal Flood 2026 : जलप्रलयात पोटचा गोळा गेला… आईवरच मुलासाठी खड्डा खोदण्याची वेळ; काळीज चिरणारी घटना

नेपाळमधील जलप्रलयात 930 लोकांचा मृत्यू झाला असून हजारो बेपत्ता आहेत. या महापुरात सर्व काही होत्याचं नव्हतं झालं, संसार उद्ध्वस्त झाले. एका मातेने आपल्याच मुलाला खड्डा खोदून पुरल्याचा हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. निसर्गाच्या या प्रकोपाने नेपाळमध्ये अभूतपूर्व विनाश घडवला असून अनेकांना हादरवून सोडले आहे.

Nepal Flood 2026 : जलप्रलयात पोटचा गोळा गेला... आईवरच मुलासाठी खड्डा खोदण्याची वेळ; काळीज चिरणारी घटना
Nepal Flood 2026
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 01, 2026 | 3:55 PM

नेपाळमध्ये आलेल्या जलप्रलयात 930 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच हजारो नागरिक बेपत्ता आहेत. सहा दिवस उलटले तरी बेपत्ता झालेल्या लोकांचा अजून शोध लागलेला नाही. नेपाळच्या जलप्रलयाने एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे. काहीच शिल्लक राहिलं नाही. लोकांचा संसार उद्ध्वस्त झाला. अनेकजण रंकाचे राव झाले. महाल कोसळले, उंच इमारती जमीनदोस्त झाल्या. सर्व काही एका क्षणात झालं. अनेकांवर तर विचित्र प्रसंग ओढवले आहेत. एका महिलेवर तर तिच्या मुलाचाच मृतदेह खड्डा खोदून गाडण्याची वेळ आली आहे. डोळ्यात अश्रू आणि हातात टिकास घेऊन तिने आपल्या लाडक्या लेकासाठी खड्डा खोदला आणि त्याला अखेरचा निरोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओलावत आहेत.

आईच्या हतबलतेचा हा व्हिडिओ अनेकांचं काळीज चिरत आहे. ज्या मुलाला तिने जन्म दिला, पालनपोषण केलं आणि प्रत्येक परिस्थितीत त्याला साथ दिली. त्याच्या चुकांवर पांघरून घातलं. त्याच्यावर कोणतं संकट येऊ नये म्हणून वाघिणीसारखी उभी राहिली. आज तिच्यावर आपल्यालच मुलाला मातीत पुरण्याची वेळ आली. निसर्गाच्या प्रकोपापुढे ती काहीच करू शकली नाही. आपल्याच हाताने आपल्या मुलाचे अंतिम संस्कार करावे लागतील याची तिला कल्पनाही नसेल. तेही अशा परिस्थितीत. 37 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओने अनेकांना हेलावून सोडलं आहे.

मुलासाठी खड्डा खोदला

या व्हिडीओत विध्वंसतेच्या खुणा अजूनही दिसत आहेत. कोलमडलेली घरं, मातीचे ढिगारे आणि चिखल अशी सर्वत्र परिस्थिती दिसत आहे. यातच एक हतबल महिला हातात टिकास आणि फावडं घेऊन जमीन खोदताना दिसत आहे. आपल्या मृत मुलासाठी ती खड्डा खोदत आहे. हा व्हिडिओ काळीज चिरणारा आहे. हा व्हिडीओ बघताना अनेकजण मनातून हादरत आहेत. ही महिला मुलासाठी खड्डा खोदताना तिच्यावर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पनाच न केलेली बरी.

नेपाळवर निसर्गाचा प्रकोप

नेपाळच्या इतिहासात 26 ऑगस्ट हा दिवस काळा दिवस म्हणून नेहमी नोंदवला जाईल. भोटेकोशी नदीला सकाळीच अचानक पूर आला. पाऊस नसतानाही नदीला पूर आला आणि रसुवा जिल्ह्य आणि जिल्ह्याच्या खालच्या परिसर पुराने जलमग्न झाला. या जलप्रलयामुळे गावं, रस्ते, पूल, विजेचे टॉवर, इमारती आदी सर्वांचं नुकसान झालं आहे. ग्लेशियर फुटल्याने हा महापूर आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us