न्यूज अँकर मागतोय भीक,तालिबानी राजवटीत पत्रकारांचा जगण्यासाठी संघर्ष

एकेकाळी प्रसिद्ध वृत्तवाहिनीचा अँकर असलेला मुसा मोहम्मदी  रस्त्यावर हातात थाळी घेऊन बसलेला फोटो आयुबीने शेअर केलाय.

न्यूज अँकर मागतोय भीक,तालिबानी राजवटीत पत्रकारांचा जगण्यासाठी संघर्ष
अफगाणिस्तानात पत्रकारांचे वाईट हाल
Image Credit source: (Image Twitter)
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 9:44 AM

काबूल : तालिबानची (Taliban) सत्ता आल्यापासून अफगाणिस्तानमधील (Afghanistan)  नागरिकांवर अत्याचार होत आहेत,गेल्या काही महिन्यापासून पुरुषप्रधान (Patriarchal) तालिबान सरकारने महिलांवर जाचक आदेश लादले आहेत. त्यात शिक्षण आणि रोजगार यासारख्या मूलभूत अधिकारांवरही बधंनं घालण्यात आली आहेत. त्याच्या या आदेशांमुळे महिलांवर तसंच पुरूषांवरही सार्वजनिक जीवनावर बरीच बंधने लादण्यात आली आहेत.

त्यांच्यावर भुकेने तडफडण्याची वेळ आली आहे. अशातच निलोफर आयुबी या महिला पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. रस्त्यावर भीक मागणाऱ्या पत्रकाराचा हा फोटो आहे.

एकेकाळी प्रसिद्ध वृत्तवाहिनीचा अँकर असलेला मुसा मोहम्मदी  रस्त्यावर हातात थाळी घेऊन बसलेला फोटो आयुबीने शेअर केलाय. ‘हा शापित इतिहास आहे, ज्याची पुनरावृत्ती झालीय,’ अशी कॅप्शन तिने लिहिली आहे. अफगाणिस्तानातील पत्रकारांच्या जगण्याचा संघर्ष पाहून नेटिजन्स हळहळत आहेत. सर्व्हेनुसार, तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून 6400 पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. रिपोर्टर्स विदाआऊट बॉर्डर्स आणि द अफगाण इंडिपेंडंट जर्नालिस्ट असोसिएशने हा सर्व्हे केला. अफगाणिस्तानात 231 मीडिया आऊटलेट बंद झाली आहेत. महिला पत्रकारांना सर्वाधिक फटका बसला आहे. 80 टक्के महिलांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सारख्या अतिरेकी संघटनेकडून इस्लामी कायद्याचा मूलतत्त्ववादी अर्थ लावून त्यायोगे नवी राजवट चालवली जात आहे. गेल्या काही काळापूर्वी बातम्या देताना महिलांनी आपले डोके बुरख्याने पुर्णपणे झाकून घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.यात महिलांचे पत्रकारितेचे अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वैयक्तिक स्वायत्तता यांवर गदा येऊन महिला पत्रकार आणि वृत्तपत्रकारांना मोठी किंमत मोजावी लागणे ही एक अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.