News9 Global Summit 2025 : एक्सपर्ट एक सुरात म्हणाले, गुंतवणूक करायची तर भारताशिवाय पर्यायच नाही; जर्मनीतून जगात गर्जना

जर्मनीतील न्यूज9 ग्लोबल समिटमध्ये भारताची आर्थिक ताकद आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम देश म्हणून पुढे आला. तज्ज्ञांनी भारताला गुंतवणुकीसाठी निर्विवाद पर्याय म्हटले. भारत-जर्मनी भागीदारी मुक्त व्यापार आणि जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले. L&T च्या अर्थशास्त्रज्ञांनी गेल्या 30 वर्षांतील भारताच्या 13% आर्थिक वाढीचे आकडे सादर करत उज्ज्वल भवितव्य अधोरेखित केले.

News9 Global Summit 2025 : एक्सपर्ट एक सुरात म्हणाले, गुंतवणूक करायची तर भारताशिवाय पर्यायच नाही; जर्मनीतून जगात गर्जना
News9 Global Summit 2025 Germany
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2025 | 6:25 PM

News9 Global Summit 2025 : जर्मनीच्या स्टुटगार्ट शहरात भारताची आर्थिक ताकद आणि वैश्विक नेतृत्वाचा डंका वाजला. टीव्ही9 नेटवर्कच्या न्यूज9 ग्लोबल समिटच्या दुसऱ्या पर्वानिमित्ताने जगाने भारताची गर्जना जर्मनीतून ऐकली. या दुसऱ्या पर्वात जगभरातील दिग्गजांनी बदलत्या वैश्विक व्यवस्थेच्या दरम्यान भारत आणि जर्मनीच्या मजबूत नात्यावर मंथन केलं. या समिटमधील एका सत्रात तर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणापासून फ्री ट्रेड करारावर उघडपणे चर्चा झाली. भारत आणि जर्मनी एकत्र येऊन जगाला कशा पद्धतीने नवीन दिशा देऊ शकतात, याचीही चाचपणी यावेळी करण्यात आली.

‘फ्री ट्रेड अॅग्रीमेंट्स अँड टॅरिफ वॉर्स: द इंडिया-जर्मनी अॅडव्हांटेज’ या महत्त्वाच्या विषयावर यावेळी मंथन करण्यात आलं. यात LBBW चे प्रबंधक निदेशक मंडळाचे सदस्य जोआचिम एर्डले, लार्सन अॅंड टुब्रो समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ सच्चिदानंद शुक्ला, स्टेट कौन्सिलर कास्पर सटर आणि प्रोफेसर सचिन कुमार शर्मा सारख्या दिग्गजांनी यावेळी आपले विचार बेधडकपणे मांडले. जेव्हा जग संरक्षणवादी धोरणे आणि टॅरिफशी लढाई लढत आहे, तेव्हा भारत आणि जर्मनी स्थिरता आणि विकासाचे दोन मजबूत स्तंभ म्हणून पुढे येऊ शकतात. एकीकडे भारताचा महाकाय बाजार आणि वाढत्या वापरकर्त्यांची शक्ती आहे. तर दुसरीकडे जर्मनीची औद्योगिक आणि तंत्रज्ञानावरची हुकूमत आहे. हा या चर्चेचा सार होता. मात्र, तज्ज्ञांच्या मते, दोन्ही लोकशाहीवादी देश मिळून केवळ सप्लाय चेनच्या झटक्यांचा सामनाच करू शकत नाही तर वैश्विक व्यापारात एक नवीन विश्वासहार्य दिशाही देऊ शकते.

30 वर्षात 13 टक्के वाढली इकोनॉमी

यावेळी लार्सन अँड टुब्रोचे मुख्य अर्थतज्ज्ञ सच्चिदानंद शुक्ला यांनीही भारतीय अर्थव्यवस्थेचं शानदार चित्र मांडलं. त्यांनी आकडेवारीच सादर केली. गेल्या 30 वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6 टक्क्याने वाढली आहे. याचा थेट अर्थ असा आहे की गेल्या 30 वर्षात आमची अर्थव्यवस्था 13 टक्क्याने वाढली आहे. या काळात प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नातही 9 टक्क्याने वाढ झाली आहे. तर या काळात अमेरिकेतील हा आकडा 4.7 टक्के वााढला आहे. या आकड्यावरूनच भारताने विकासाची मजबूत हनुमान उडी घेतल्याचं दिसून येत आहे. आज भारत जगाच्या नजरेत चमकता तारा बनला आहे, असं सच्चिदानंद शुक्ला म्हणाले.