AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

North Korea: उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने वाढविली जगाची चिंता, अण्वस्त्रांच्या बाबतीत घेतला मोठा निर्णय!

North Korea The dictator of North Korea raised the concern of the world took a big decision in terms of nuclear weapons

North Korea: उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने वाढविली जगाची चिंता, अण्वस्त्रांच्या बाबतीत घेतला मोठा निर्णय!
उत्तर कोरिया Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 10, 2022 | 6:30 PM
Share

North Korea: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने आता संपूर्ण जगासमोर नवे संकट उभे केले आहे. हुकूमशहा किम जोंग उन याने नवीन एक नवीन कायदा लागू केला आहे.  हा कायदा उत्तर कोरियाच्या लष्कराला परस्पर शत्रूंवर आण्विक (nuclear war) हल्ले करण्याचा अधिकार देतो. उत्तर कोरियाच्या या निर्णयाने साऱ्या जगाला चिंतेत टाकले आहे. उत्तर कोरियामध्ये क्षेपणास्त्र चाचण्या (nuclear test) आणि आण्विक शस्त्रास्त्रांवर अनेकदा चर्चा होत असते. दरम्यान, उत्तर कोरियाचा हुकूमशहा आपल्या अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्राचा परीघ वाढविण्यात कायमच गुंतलेला असतो. अण्वस्त्रांबाबत (nuclear weapons) उत्तर कोरियाचा नवा कायदा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनीही उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांबाबतच्या नवीन कायद्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

काय आहे कायदा?

संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी शुक्रवारी सांगितले की, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस हे उत्तर कोरियाच्या नवीन कायद्याबद्दल अत्यंत चिंतित.  अँटोनियो गुटेरेस यांनी प्योंगयांगला चिरस्थायी शांतता आणि कोरियन द्वीपकल्पाच्या पूर्ण आणि सत्यापित अण्वस्त्रमुक्तीसाठी प्रमुख पक्षांशी पुन्हा चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

अण्वस्त्रांबाबत उत्तर कोरियाचा नवा कायदा अत्यंत चिंताजनक असल्याचे अँटोनियो गुटेरेस यांचे मत आहे.

 उत्तर कोरियाच्या नव्या कायद्यामुळे चिंता का वाढली आहे?

उत्तर कोरियाच्या संसदेच्या सदस्यांनी अण्वस्त्रांच्या वापराबाबत कायदा संमत केला आहे. हा कायदा उत्तर कोरियाच्या लष्कराला परस्पर शत्रूंवर आण्विक हल्ले करण्याचा अधिकार देतो. याआधी हुकूमशहा किम जोंग याने अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाकडून धमकी दिल्यास उत्तर कोरिया अण्वस्त्रांचा सक्रिय वापर करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही दिला होता.

किम जोंगने केले अमेरिकेवर आरोप

अमेरिकेला आमची अण्वस्त्र शक्ती संपवायची आहे.  उत्तर कोरियाला कमकुवत करून राजवट स्थापन करायची असल्याचा आरोप किम जोंगने केला आहे. उत्तर कोरियाने आपल्या धोरणात्मक आण्विक मोहिमेची व्याप्ती सतत वाढवली पाहिजे, जेणेकरून आण्विक युद्धाची क्षमता मजबूत करून शत्रूला चोख प्रत्युत्तर देता येईल, असे किम जोंग म्हणाले होते.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले