बिग ब्रेकिंग! अफेयर महागात पडलं; Nvidiaचे CEO जेन्सन हुआंग यांचा राजीनामा

जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) उद्योगातील सर्वात प्रमुख व्यक्तींपैकी एक असलेल्या एनव्हिडियाचे सह-संस्थापक आणि सीईओ जेन्सन हुआंग यांनी राजीनामा दिला आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, हुआंग यांच्या जागी कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) कोलेट क्रेस यांची अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बिग ब्रेकिंग! अफेयर महागात पडलं; Nvidiaचे CEO जेन्सन हुआंग यांचा राजीनामा
| Updated on: Nov 12, 2026 | 7:53 PM

 Nvidia ceo jensen huang Resign: जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) उद्योगातील सर्वात प्रमुख व्यक्तींपैकी एक असलेल्या एनव्हिडियाचे सह-संस्थापक आणि सीईओ जेन्सन हुआंग यांनी राजीनामा दिला आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, हुआंग यांच्या जागी कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) कोलेट क्रेस यांची अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अफेयर महागात पडलं, सर्वात मोठ्या AI कंपनीच्या CEOचा राजीनामा!

Loading...

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जेन्सन हुआंग यांनी एनव्हिडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. एका चिनी गुप्तहेराच्या वादात अडकल्यानंतर हुआंग यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी 33 वर्षे कंपनीचे नेतृत्व केले होते. हुआंग यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी (CFO), कोलेटी क्रेस यांची अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीचे संचालक मंडळ आता जेन्सन हुआंग यांच्या जागी कायमस्वरूपी सीईओच्या शोधाला सुरुवात करेल, ज्यामध्ये कंपनीतील आणि बाहेरील दोन्ही उमेदवारांचा विचार केला जाईल.

अहवालानुसार, हुआंग यांचे त्यांच्याच कंपनीतील एका महिला अधिकाऱ्यासोबत प्रेमसंबंध होते, जी त्यांच्या हाताखाली काम करत होती. इतकेच नाही, तर त्यांच्यावर एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचाही आरोप आहे, जिला अमेरिकन अधिकाऱ्यांनी चिनी गुप्तहेर म्हटले आहे. या खुलाशांनंतर, कंपनीच्या संचालक मंडळाने बुधवारी संध्याकाळी अनेक तास बैठक घेतली आणि नवीन नेतृत्वाबाबत निर्णय घेतला.

कंपनीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह! 

दरम्यान, हुआंग यांच्या जाण्याने एनव्हिडियाच्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (AI) वापरल्या जाणाऱ्या चिप्सच्या जगातील सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. असा अंदाज आहे की, प्रमुख एआय (AI) प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्युटर चिप्सच्या बाजारपेठेत एनव्हिडियाचा (Nvidia) सुमारे 90वाटा आहे. कंपनीच्या या मजबूत स्थितीमुळे ती जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक बनली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us