Operation Sindoor : वरून छोटासाच होल दिसतो पण आत भयानक विद्ध्वंस; पाकच्या त्या एअरबेसची खरी माहिती समोर

Operation Sindoor : भारताने पाकिस्तान एअर फोर्सच्या ज्या बेसना लक्ष्य केलं, त्याचे फोटो दाखवले. उपग्रह छायाचित्रांमध्ये भोलारी एअर बेसवर एक छोटसा होलं दिसतय. बाकी उर्वरित बेसच छप्पर कायम आहे. वरुन जरी छोटासा होल वाटत असला, तरी आतमध्ये किती भयानक नुकसान झालय त्याची खरी माहिती आता समोर आली आहे.

Operation Sindoor : वरून छोटासाच होल दिसतो पण आत भयानक विद्ध्वंस; पाकच्या त्या एअरबेसची खरी माहिती समोर
particular hangar at the Bholari airbase in pakistan
| Updated on: May 29, 2025 | 1:37 PM

ऑपरेशन सिंदूर राबवताना 10 मे च्या रात्री इंडियन एअर फोर्सने आपला सर्वोच्च पराक्रम दाखवला. पाकिस्तानने आधी भारतीय शहरं आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारताने दीर्घकाळ पाकिस्तानच्या लक्षात राहील असं प्रत्युत्तर दिलं. भारताने पाकिस्तानातील जवळपास 10 ते 12 एअरबेसना लक्ष्य केलं. भारताने हे जे हल्ले केले, त्यात पाकिस्तानी एअर बेसेसच किती नुकसान झालं, ते उपग्रह फोटोंच्या माध्यमातून समोर आलं. पण भोलारी एअर बेस जो आहे, त्याच्या उपग्रह छायाचित्रामध्ये एक छोटासा होल दिसतोय. या एअर बेसवरील बाकीच छप्पर आहे, पण एका ठराविक भागात होल आहे.

भारताने भोलारी एअर बेसवर हल्ला करताना हँगरला टार्गेट केलं. भारताने यासाठी ब्राह्मोस मिसाइलचा वापर केला. वरुन छोटासा होल दिसत असला, तरी या एअरबेसवर आतमध्ये किती प्रचंड नुकसान झालय त्याची माहिती आता समोर आली आहे. भोलारी एअर बेसच्या हँगरमध्ये साब 200 अवॉक्स आणि अन्य फायटर जेट्स होती. ही विमान भारताच्या हल्ल्यात नष्ट झाली आहेत. चार फायटर जेटस नष्ट झाली. अवॉक्सला हवेतील रडार म्हटलं जातं. या विमानाच्या माध्यमातून शत्रूच्या एअर बेसवरील हालचाली समजतात. अवॉक्सद्वारे ग्राऊंड बेसशी समन्वय साधून हल्ला आणि बचावाची रणनिती आखली जाते.

भोलारी बेसवर किती सैनिकांचा मृत्यू झाला?

भोलारी एअर बेस कराची बंदरापासून 100 मैलापेक्षा कमी अंतरावर आहे. इंडियन एअर फोर्सने तीन ते चार एअर डिफेन्स मिसाइल लॉन्चर्स उडवले. त्याशिवाय पंजाब प्रांतातील अमेरिकन आणि चिनी रडार उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये भोलारी एअर बेसवर तैनात असलेल्या सहा एअर फोर्स कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याच स्पष्ट केलं होतं.

भोलारी बेसच महत्त्व काय?

डिसेंबर 2017 मध्ये पाकिस्तानचा भोलारी एअरबेस कार्यान्वित झाला होता. पाकिस्तानचा हा सर्वात अत्याधुनिक आणि मुख्य ऑपरेशनल बेस होता. 19 स्क्वाड्रनची तुकडी इथे तैनात असायची. F-16A/B Block 15 ADF विमानं इथे तैनात होती.