… तर कोव्हिशील्‍डच्या तिसऱ्या डोसने कोरोनाचा प्रत्येक विषाणू हरणार? वाचा नवा अभ्यास काय सांगतोय

| Updated on: May 22, 2021 | 3:27 AM

कोव्हिशील्ड लसीचा तिसरा बुस्टर डोस दिल्यानंतर शरीराला सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंपासून संरक्षण मिळेल, असा दावा या अभ्यासात करण्यात आलाय.

… तर कोव्हिशील्‍डच्या तिसऱ्या डोसने कोरोनाचा प्रत्येक विषाणू हरणार? वाचा नवा अभ्यास काय सांगतोय
कोविशिल्डचा डोस घेतलेल्या भारतीयांचं ब्रिटनमधलं क्वारंटाईन बंद
Follow us on

लंडन : सध्या जगभरात कोरोना विषाणूपासून संरक्षणासाठी कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु आहे. यासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या लसी वापरल्या जात आहे. यापैकी एक महत्त्वाची लस म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठाने शोधलेल्या एस्ट्रोजेनेका म्हणजेच कोव्हिशील्ड लस. याच लसीबाबत ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात एक मोठी गोष्ट समोर आलीय. कोव्हिशील्ड लसीचा तिसरा बुस्टर डोस दिल्यानंतर शरीराला सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंपासून संरक्षण मिळेल, असा दावा या अभ्यासात करण्यात आलाय. त्यामुळे आगामी काळात 2 डोस पूर्ण झाल्यानंतर कोव्हिशील्डच्या तिसऱ्या डोसलाही सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे (Oxford University study say third booster dose of Covishield vaccine will be needed).

ऑक्सफर्डच्या अभ्यासात सांगण्यात आलंय की, “कोव्हिशील्ड लसीच्या तिसऱ्या बुस्टर डोसनंतर कोरोना संसर्गापासून मोठ्या प्रमाणात सुरक्षा मिळेल. यामुळे शरीराचा कोरोनाच्या सर्व विषाणूंपासून संरक्षण देईल.”

सध्या जगभरात कोरोना लसीचे दोनच डोस

भारतासह जगभरात सध्या कोरोना लसीचे दोनच डोस दिले जात आहेत. त्यात कोव्हिशील्‍डच्या दोन डोसमध्ये 28 दिवस ते 16 आठवड्यांपर्यंतचं अंतर ठेवण्यात येतंय. मात्र, आता नव्याने झालेल्या संशोधनात लसीचा तिसरा बुस्टर डोस कोरोना विषाणूच्या स्पाईक प्रोटीनविरुद्ध शरीरात अँटिबॉडीची संख्या वाढवत असल्याचं समोर आलंय. बुस्टर डोसने अँटीबॉडी रिअॅक्शन तयार केल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे कोरोनाच्या कोणत्याही व्हॅरिएंटचा सामना करण्यास शरीर सक्षम होईल, असं ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांनी म्हटलंय.

दरवर्षी कोरोना लसीचा बुस्टर डोस घ्यावा लागणार?

लसी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी आगामी काळात नागरिकांना दरवर्षी कोरोना लसीचा बुस्टर डोस घ्यावा लागेल असं म्हटलंय. पुढील काळात कोरोनाचे आणखी घातक नवे विषाणू येतील. त्यांचा सामना करण्यासाठी हे बुस्टर डोस आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. फायझर कंपनीने देखील कोरोना लसीच्या तिसऱ्या डोसची गरज असल्याचं म्हटलंय.

तिसऱ्या डोसची गरज का?

ज्या प्रमाणे दरवर्षी सिझनल फ्लूची (हंगामी ताप) साथ आल्यावर त्यावर औषध घ्यावं लागतं त्याप्रमाणेच कोरोनाच्या नव्या विषाणूंचा सामना करण्यासाठी देखील दरवर्षी कोरोना लस घ्यावी लागेल असं संशोधकांनी म्हटलंय. कोरोना लसीतून मिळालेली रोगप्रतिकारक शक्ती काळानुसार कमी होऊ शकते, असाही अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यामुळेच दरवर्षी कोरोना लसीचा बुस्टर डोस घेण्यावर अधिक भर दिला जात आहे.

हेही वाचा :

कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसनंतर जास्त अँटीबॉडी तयार होतात, ICMR प्रमुखांचा दावा

‘केंद्राच्या समितीतील तज्ज्ञांना जमिनीवरील वस्तूस्थितीची कल्पना नाही’, घरोघरी जाऊन लसीकरणाच्या मुद्द्यावर हायकोर्टाची तीव्र नाराजी

मलावीने 19,610 कोरोना लस जाळल्या, असं करणारा पहिला आफ्रिकन देश, कारण काय?

व्हिडीओ पाहा :

Oxford University study say third booster dose of Covishield vaccine will be needed