
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांच्या हस्ते सुंदर पिचाई यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारतातील तिसरा सर्वोच्च पुरस्कार देत सुंदर पिचाई यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

तमीळनाडूतील मदुराई ते गुगलचं कार्यालय असलेल्या माउंटेन व्यूपर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचं म्हणत भारताकडून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आलाय.

सुंदर पिचाई यांनीही या सन्मानासाठी भारत सरकारचे आभार मानलेत. पद्मभूषण पुरस्कार देत माझा गौरव केला याबद्दल भारत सरकारचे आभार, असं सुंदर पिचाई म्हणालेत.