
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर देशात पाकिस्तानविरोधात एकच संतापाची लाट उसळली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धाचे ढग गडद झाले आहेत. पाकिस्तानचे सरकार हे कठपुतली असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. ते बोलके बाहुले आहे. खरी सत्ता लष्कराकडे आहे. लोकशाहीचा केवळ देखावा आहे. येथील लष्कर प्रमुखाच्या ना ना तऱ्हा आहेत. त्यात हा तर आतापर्यंतचा सर्वांत रंगेल लष्कर प्रमुख होता.
तो अय्याश जनरल
16 डिसेंबर 1971 रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याला गुडघे टेकावायला लावले. बांग्लादेश मुक्ती संग्रामात भारतीय लष्कराने मोलाची मदत केली. अवघ्या 13 दिवसात पाकिस्तानी फौज शरण आली. ढाका येथे 93 हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्करासमोर शरणागती पत्करली. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. बांग्लादेश स्वतंत्र झाला.
याह्या खान एक नंबर रंगेल
भारत आणि पाकिस्तानमध्ये जेव्हा हे युद्ध झाले. त्यावेळी पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख याह्या खान हा होता. पाकिस्तानी इतिहासात त्याच्या वीरकथा नाही तर अय्याशीचे किस्से लोकप्रिय आहेत. तो अंगावर एकही कपडा न ठेवता नग्नवस्थेत दारू ढोसत असे आणि तसाच पार्टी करत असल्याचे किस्से पाकिस्तानचे सैनिक आजही सांगतात. त्याच्या पार्टीत देशातील ठराविक महिला दिमतीला असत. पाकिस्तान एट दे हेल्म या पुस्तकात तिलक देवेशर यांनी याह्या खानच्या या रंगबाजीचे रंग टिपलेले आहेत. तो शबाब आणि शराबमध्ये पूर्णपणे डुबलेला होता. रात्री 10 नंतर त्याचे हे विचित्र वागणे समोर आल्याने अधिकारी आणि सैनिक त्याच्या घरात प्रवेश करत नसत.
हाऊस वार्मिंग पार्टीत उधळायचा रंग
जनरल याह्या खान याच्या घरात पार्टी होत होती. त्यात देशातील सेलिब्रिटी आणि नामचिन व्यक्ती सहभागी होत. या पार्टीला हाऊस वार्मिंग पार्टी म्हणत. या पार्टीत जे पुरूष आणि महिला सहभागी होत, ते दारूचा अंमल वाढताच अंगावरची कपडे काढून बेधूंद होत. अंगावर एकही कपडा नसलेली ही पार्टी उत्तर रात्री जास्त चेकळायची. ही पार्टी त्यावेळी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली होती.
खास मैत्रिणीला केले राजदूत
याह्या याच्या खास मैत्रिणींची यादी भली मोठी होती. त्यात त्याचे जवळचे अधिकारी आणि विविध उच्च पदसिद्ध अधिकाऱ्यांच्या बायकांचा आणि स्त्रीयांचा समावेश होता. त्या खास रात्रीच्या पार्टीसाठी त्याच्या घरी यायच्या. त्यात याह्याची ब्लॅक पर्ल नावाची एक लोकप्रिय बंगाली मैत्रिण होती. तिचे नाव शमीम असे होते. तिने या रात्रीची पार्टी गाजवल्याने याह्याने तिला ऑस्ट्रियात पाकिस्तानची राजदूत म्हणून नेमले होते. तर एकदम खास मैत्रिण अक्लीम अख्तर हिला त्यावेळी जनरल राणी असे म्हटल्या जाई. तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांनी याह्याला नजरकैदत ठेवले होते. त्यानंतर जनरल जिया उल हक याने भुट्टो यांना फासावर लटकवले आणि याह्याला कैदेतून मुक्त केले. पुढे 1980 मध्ये या रंगेल जनरलचा मृत्यू झाला.