Balochistan : स्वातंत्र्याचा झेंडा फडकला, पाकिस्तानी सैन्यावर बलूचिस्तान सोडून पळण्याची वेळ VIDEO

Balochistan : स्वतंत्र बलूचिस्तानची मागणी करणारे आज एकतर पाकिस्तानी तुरुंगात आहेत किंवा त्यांची हत्या झाली. आज बलूचिस्तानचे लोक रस्त्यावर आहेत. पाकिस्तानला विरोध करतायत. त्यामुळे त्यांच्या सैन्याला तिथून माघारी फिरावं लागतय.

Balochistan : स्वातंत्र्याचा झेंडा फडकला, पाकिस्तानी सैन्यावर बलूचिस्तान सोडून पळण्याची वेळ VIDEO
pakistan vs balochistan
| Updated on: Sep 05, 2025 | 9:23 AM

पाकिस्तानी सैन्याची दिवसेंदिवस बलूचिस्तानात हालत खराब होत चालली आहे. स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासमोर बलूचिस्तान प्रांताने एक मोठं आव्हान निर्माण केलय. या प्रातांमध्ये पाकिस्तानी सैन्याची स्थिती इतकी खराब आहे की, अनेक भागात पाकिस्तानी सैन्याला मागे हटावं लागतय. या ठिकाणी बलूच लिबरेशन आर्मीसह दुसऱ्या सशस्त्र संघटनांनी अनेक भाग ताब्यात घेतले आहेत. त्यांनी अनेक व्हिडिओ जारी केले आहेत. यात जहारी गावात पाकिस्तानी सैन्याच्या चौकीवर बलूच झेंडा फडकताना दिसतोय. काही व्हिडिओमध्ये पाकिस्तानी सैनिक आपले तळ सोडून माघारी जाताना दिसतायत.

बलूचिस्तानच्या अनेक भागातून पाकिस्तानी सैन्य मागे फिरतय, हा व्हिडिओ मीर यार बलूच यांनी एक्सवर शेअर केलाय. ते स्वत:ला बलूच प्रतिनिधी, लेखक, स्वतंत्र पत्रकार, मानवाधिकाराचे रक्षक आणि कुटनितीक अधिकारी असल्याच सांगतात. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यात पाकिस्तानी सैन्य चौक्या, मोबाइल टॉवरवर बलूचिस्तानचा झेंडा फडकताना दिसतो.

पाकिस्तानची ‘लंबर’ 1 फौज पळ काढतेय

“पाकिस्तानची ‘लंबर’ 1 फौज बलूचिस्तानात पळ काढतेय. जहारी गावात पाकिस्तानी सैन्याचं आत्मसमर्पण आणि पराभवाच हा एक व्हिडिओ पुरावा आहे. “बलूच शांतताप्रिय लोक आहेत. शेजारी देश पाकिस्तानने हिंसाचाराने बलूचिस्तानला अस्थिर करु नये” असं मीर यार बलूच यांनी म्हटलं आहे.

मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पाडला

बलूचिस्तान पाकिस्तानी सैन्याच्या हातातून निसटत चाललाय ही पाकिस्तानसाठी लाजिरवाणी बाब आहे. पाकिस्तानी सैन्याने इथे शांततेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पाडला. सामान्य बलूच नागरिकांवर अत्याचार केले. त्यांची हत्या केली. बलूचिस्तानातून अनेक लोक गायब झाले. पाकिस्तानच्या स्थापनेपासून बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी होत आहे. बलूचिस्तानात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पाकिस्तान बलूचिस्तानची लूट करुन पंजाबची घर भरतो, असा नेहमी आरोप केला जातो.


आता अमेरिकेची नजर

बलूचिस्तानात तेल-गॅससह अन्य महत्वाच्या खनिजाचं भांडार आहे. चीन-पाकिस्तान कॉरिडोरची सुरुवात झाल्यापासून इथे पाकिस्तान विरोधात रोष वाढला. पाकिस्तानी सैनिकांची हत्या सुरु झाली. याच भागात ग्वादर बंदर आहे. बलूचिस्तानच्या जीवावर पाकिस्तान बराच पैसा कमावतो. पण इथल्या लोकांना त्याचा फायदा मिळत नाही. आता अमेरिकेची सुद्धा याच भागातील साधन संपत्तीवर नजर आहे. बलूचिस्तानचा भाग इराणला लागून आहे.