AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Kapoor : रणबीर कपूरचा अभिनय क्षेत्राला रामराम? ‘रामायण’ ठरणार शेवटचा चित्रपट? म्हणाला…

नुकत्याच रिलीज झालेल्या रामायणात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत म्हणजेच रामाच्या भूमिकेत आहेत. मात्र हे प्रोजेक्ट शेवटचे असल्याचे त्याने जाहीर केले आहे. या प्रोजेक्टनंतर तो अॅक्टिंग सोडणार आहे असे रणबीरने स्वत: जाहीर केले आहे.

Ranbir Kapoor : रणबीर कपूरचा अभिनय क्षेत्राला रामराम? 'रामायण' ठरणार शेवटचा चित्रपट? म्हणाला...
ranbir kapoor ramayanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 07, 2026 | 6:03 PM
Share

रामायणात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा जोरदार कमाई करताना दिसत आहे. पण रणबीरचा हा शेवटचा प्रोजेक्ट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. रणबीर रामायणानंतर अॅक्टिंगचे करिअर सोडणार आहे, असे त्याने एका मुलाखतीत स्वत: जाहीर केले आहे. त्याच्या या वतव्यामुळे फॅन्स भावूक झाले असून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

रणबीर कपूर सध्या ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत आहे, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाच्या निमित्ताने दोघांनी बीबीसी एशियन नेटवर्कला मुलाखत दिली.यावेळी रणबीरने त्याच्या कामाच्या वेळापत्रकाबद्दल आणि भविष्यातील योजनांबद्दल सांगितलं. रणबीर म्हणाला की, अभिनेता म्हणून कदाचित हे त्याचं शेवटचं दशक असेल, त्याचं हे वाक्य ऐकताच साई पल्लवी देखील आश्चर्यचकित झाली आणि तिने लगेचचं ‘ओह’ अशी प्रतिक्रिया देखील दिली. मात्र रणबीरने आपलं म्हणणं स्पष्ट करत सांगितले की त्याला अभिनय पूर्णपणे सोडणार असं त्याचं म्हणणं नाही.सध्या ज्या प्रकारच्या भूमिका त्याला मिळत आहेत तशा भूमिका पुढे किती काळ करता येतील. त्यापासून तो दूर जाण्याचा विचार करत आहे.

रणबीरने असे सांगितले की त्याला आता चित्रपट दिग्दर्शित करायचा आहे. दिग्दर्शनातील आपल्या आवडीबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला, “दिग्दर्शक नेहमी काहीतरी विचार करत असतात, तर अभिनेते फक्त आपला शॉट देतात आणि पुढच्या सीनची वाट पाहतात.

रणबीरने त्याला कोणत्या प्रकारचा चित्रपट दिग्दर्शित करायचा आहे याबद्दलही सांगितले. तो अभिनेता म्हणाला, “मी काही महिन्यांपूर्वी पटकथा लिहायला सुरुवात केली. खरं सांगायचं तर, कथा तयार करणे हे एक खूप कठीण काम आहे, म्हणूनच माझा लेखकांसाठी आदर प्रचंड वाढला आहे. रणबीर असं म्हणाला की, ‘त्याला विश्वास आहे की संगीतकारांनंतर, सर्वात जास्त समाधान फक्त दिग्दर्शकालाच मिळते. अभिनेत्याला मिळणारा आनंद वरवरचा असतो, पण एक कथा सांगण्यासाठी इतक्या लोकांना एकत्र आणणे हा खरोखरच एक सुंदर अनुभव आहे. मला आशा आहे की मी ते साध्य करू शकेन.”

रणबीर पुढे म्हणाला, “मी वर्षातून फक्त १००-१२५ दिवस काम करतो, त्यामुळे मला कथा लिहायला वेळ मिळतो. मी कधीच फार व्यस्त नसतो. पण मला वाटतं की एक अभिनेता म्हणून हे माझं शेवटचं दशक आहे. मला दिग्दर्शनाकडे वळायचं आहे. पुढच्या दोन-तीन वर्षांत माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटावर काम सुरू करण्याची मला आशा आहे.”

रणबीर कपूरचे वक्तव्य वेगाने व्हायरल होत आहे. अभिनेता म्हणून त्याच्या शेवटच्या दशकाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. एका युझरने लिहिले, “असे बोलू नकोस, रणबीर. तू फक्त ४४ वर्षांचा आहेस. आम्हाला तुला पुढची दोन दशके पडद्यावर पाहायचे आहे.

मात्र रणबीरने सध्या अभिनय सोडण्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्याचा भर दिग्दर्शनाकडे आहे असे या मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे.

Follow Us
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत...
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत वृक्षतोडीला विरोध
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला...
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड