AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : ना तामझाम, ना देखावा! एकनाथ शिंदेंची यंदा दिवाळी दुष्काळग्रस्तांसोबत, उचललं मोठं पाऊल

दिवाळीच्या सणात राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा निर्णय शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात जाणार असून, अन्य 11 मंत्र्यांचे दौरेही निश्चित झाले आहेत. कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्यात जाणार?

Shivsena : ना तामझाम, ना देखावा! एकनाथ शिंदेंची यंदा दिवाळी दुष्काळग्रस्तांसोबत, उचललं मोठं पाऊल
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत मंत्र्यांची दिवाळी! एकनाथ शिंदेंसह 12 मंत्री कोणत्या जिल्ह्यात जाणार?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 07, 2026 | 5:50 PM
Share

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे मंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 12 मंत्र्यांचे दौरे निश्चित झाले असून, हे मंत्री दुष्काळग्रस्त गावांमध्ये जाऊन शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. एकनाथ शिंदे उद्या (8 नोव्हेंबर) जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार असून, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान शिंदे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. तसेच दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेऊन त्यांना आवश्यक मदत मिळवून देण्याबाबत चर्चा करणार आहेत. केवळ एकनाथ शिंदेच नव्हे, तर शिवसेनेच्या इतर मंत्र्यांनाही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणते मंत्री कोणत्या जिल्ह्यात जाणार?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना जिल्ह्यात जाणार असून, उदय सामंत नांदेड, गुलाबराव पाटील जळगाव, प्रताप सरनाईक ठाणे आणि दादा भुसे नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांना भेट देणार आहेत. याशिवाय संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर, शंभूराज देसाई सातारा, प्रकाश आबिटकर सांगली आणि भरतशेठ गोगावले पुणे जिल्ह्यात जाणार आहेत. संजय राठोड यवतमाळ, योगेश कदम पालघर, तर आशिष जयस्वाल नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत.

7 लाख 69 हजार दिवाळी शिधा किट वाटपाचे उद्दिष्ट

दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून दिवाळी शिधा किट वाटपाचा उपक्रमही राबवण्यात येत आहे. राज्यातील 278 तालुक्यांमधील शेतकरी कुटुंबांसाठी 7 लाख 69 हजार दिवाळी शिधा किट वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 5 लाख 38 हजार 500 किटचे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित किटचे वाटपही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली होती.

या उपक्रमाच्या माध्यमातून दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. आता उद्यापासून मंत्री प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार असल्याने या दौऱ्यांकडे लक्ष लागले आहे.

Follow Us
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत...
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत वृक्षतोडीला विरोध
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला...
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच