फक्त झोपण्यासाठी ही कंपनी देते महिन्याला 5 लाख रुपये पगार, कामाचं टेन्शनच नाही, अप्लाय कसं करायचं?
तुम्हाला जर असं कोणी सांगितलं की तुम्हाला फक्त झोपायचं आहे, दुसरं कोणतंही काम करायचं नाही, त्याबदल्यात तुम्हाला दर महिन्याला पाच लाख रुपये मिळतील, हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र ही गोष्ट खरी आहे.

विचार करा तुम्हाला फक्त झोपण्याचं काम करायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही, आणि या कामाचे तुम्हाला मिळणार आहेत एक दोन लाख रुपये नाही तर तब्बल दहा लाख रुपये. जर तुम्हाला असं काम मिळालं तर तुम्ही काय कराल? अशीच एक ऑफर एका कंपनीकडून देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाहीये, तुम्हाला न ऑफिसमध्ये जाण्याचं टेन्शन आहे, न तासंतास कॉम्प्युटरवर बसण्याचं टेन्शन. तुम्हाला फक्त झोपायचं आहे, एवढीच कंपनीची तुमच्याकडून अपेक्षा आहे. हे ऐकायला थोडं विचित्र वाटत आहे, परंतु मुंबईतील एका महिलेनं खरोखर ही इंटर्नशिप जिंकली आहे. ही इंटर्नशिप जिंकल्यानंतर या महिलेला तब्बल 9.6 लाख रुपये कंपनीकडून देण्यात आले आहेत. गाद्या आणि स्लीप प्रोडक्ट बनवणाऱ्या वेकफिट नावाच्या कंपनीकडून ही ऑफर देण्यात आली होती. वेकफिटने आपल्या पाचव्या स्लीप इंटर्नशिपचं आयोजन केलं होतं, ही इंटर्नशिप मुंबईमधील एका महिलेलं जिंकली आहे, या महिलेला कंपनीने तब्बल 9.6 लाख रुपये दिले आहेत. एवढंच नाही तर या महिलेला कंपनीकडून काही देश अगदी मोफत फिरण्याची ऑफर देखील देण्यात आली आहे.
इंटर्नशिपचा अर्थच असा असतो की, तुम्ही त्या कंपनीमध्ये काहीतरी विशिष्ट काम करतात. तुम्हाला तिथे शिकायला मिळतं, त्याबदल्यात कंपनी काही पैसे देते. परंतु इथे कोणतंही काम करण्याची गरज नव्हती. या इंटर्नशिपमध्ये ज्या लोकांची निवड झाली त्या-त्या लोकांना फक्त आपल्या झोपेवर लक्ष केंद्रीय करायचं होतं. त्यांना दररोज फक्त पुरेशी झोप घ्यायची होती, तसेच मधे -मधे काही मजेशीर टास्क पूर्ण करायचे होते. लोकांना चांगल्या झोपेचं महत्त्वं लक्षात यावं, आणि त्यांनी आपल्या झोपेकडे देखील अधिक लक्ष द्यावं, असा या टास्कचा उद्देश होता. मुंबईतील एका महिलेनं हा टास्क जिंकला आहे. दरम्यान कंपनीकडून अशा इटर्नशिपचं नियमितपणे आयोजन केलं जातं.
या कामासाठी तब्बल दोन लाख लोकांनी अर्ज केला होता, त्यातील दहा जणांची निवड करण्यात आली, या लोकांना एकूण 60 दिवसांचा टास्क देण्यात आला होता. त्यांचं काम फक्त एवढंच होतं की, त्यांना आपल्या झोपेचं रेकॉर्ड ठेवायचं होतं. कंपनीकडून या लोकांच्या झोपेच्या सवयीवर लक्ष ठेवण्यात आलं, म्हणजे हे लोक दिवसातून किती तास झोपतात, त्यांना शांत झोप लागते का अशा गोष्टी तपासण्यात आल्या. ज्या लोकांचा स्लिप स्कोर चांगला होता, त्यांना कंपनीकडून पैसे देण्यात आले. याचाच अर्थ एका साध्या इटर्नशिपसाठी या महिलेला प्रत्येक महिन्याला पाच लाख रुपये मिळाले आहेत.
