Madhuri Dixit Son : डिट्टो माधुरी दीक्षित सारखाच… कोण आहे अरिन नेने? काय करतो? नेटवर्थ किती?
माधुरी दीक्षितचा मुलगा अरिन नेने सध्या चर्चेत आहे. दिवाळी पार्टीत गर्लफ्रेंडसोबत दिसल्याने तो लाइमलाइटमध्ये आला. अरिनने अमेरिकेतून इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून, तो ऍपल कंपनीत मशीन लर्निंग इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. त्याने संगीत निर्मितीचे शिक्षणही घेतले आहे.

धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा मुलगा अरिन नेने अचानक चर्चेत आला आहे. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या दिवाळी पार्टीत माधुरी कुटुंबासह गेली होती. तिथे अरिनसोबत त्याची गर्लफ्रेंड खुशीही आली होती. अरिन आणि खुशी एकत्र दिसल्याने लागलीच त्यांची चर्चा सुरू झाली. त्यामुळे अरिनही लाइमलाइटमध्ये आला आहे. माधुरीचा हा मुलगा नेमका करतो काय? त्याचं शिक्षण कुठपर्यंत झालं? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा.
डिट्टो माधुरी सारखाच
अरिनचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अरिन डिट्टो माधुरी दीक्षित सारखाच दिसत आहे. एखाद्या अभिनेत्यालाही टक्कर देईल अशी त्याची पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे अरिन भविष्यात सिनेमात येणार की आपली वाट वेगळी निवडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इंजीनिअर ते म्यूजिक प्रोडक्शन
माधुरी आणि श्रीराम नेने यांना दोन मुले आहेत. अरिन आणि रायन. अरिनचा जन्म 17 मार्च 2003मध्ये झाला. तो 23 वर्षाचा आहे. अमेरिकेच्या कोलोरॅडोतील डेनवर येथे अरिनचा जन्म झाला. अरिनने नुकचं त्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याने अमेरिकेच्या यूनिव्हर्सिटी ऑफ साऊथर्न कॅलिफोर्नियाच्या व्हिटर्बी स्कूल ऑफ इंजीनिअरिंगमधून इंजीनिअरिंगची पदवी घेतली आहे. त्याने कॉम्प्युटर सायन्स आणि बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये बॅचलर ऑफ सायन्सची (B.S.) पदवी घेतली आहे. त्यानंतर त्याने म्यूजिक प्रोडक्शनमध्ये मायनर कोर्सही पूर्ण केला आहे.
फेसबुकच्या टीममध्ये काम
अरिनचं प्राथमिक शिक्षण भारतात अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमध्ये झालं. त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. अमेरिकेत ASB तून त्याने उच्च शिक्षण घेतलं. त्याने 2017 ते 2021 पर्यंत IB Diploma केला. त्याने कॅलिफोर्नियात फेसबुकच्या मार्केटिंग टीमसोबत 5 महिने इंटर्नशीप केली. तिथे त्याला प्रॅक्टिकल अनुभव मिळाला.
सध्या काय करतो?
अरिन सध्या टेक कंपनी अॅप्पलच्या मशीन लर्निंग इंजीनियर म्हणून कार्यरत आहे. माधुरीच्या सांगण्यानुसार, तो नॉइज कॅन्सेलेशनशी संबंधित प्रोजेक्टवर काम करत आहे. अरिनने 2025 मध्येच त्याचं शिक्षण पूर्ण केलं असून कार्पोरेटमध्ये काम सुरू केलं आहे. त्यामुळे त्याची नेटवर्थ उपलब्ध नाहीये. पण त्याचे आईवडील माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची संपत्ती 350 ते 400 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.
