AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांच्या निधनानंतर विलिनीकरणासंदर्भांत नेमकं काय ठरलं होतं? सुनील तटकरेंनंतर NCPच्या आणखी एका बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

अजित दादा असते तर 12 फेब्रुवारीला विलिनीकरण झाले असते असं मोठे विधान सुनील तटकरेंनी केले होते. सुनील तटकरेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असतानाच राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

अजितदादांच्या निधनानंतर विलिनीकरणासंदर्भांत नेमकं काय ठरलं होतं? सुनील तटकरेंनंतर NCPच्या आणखी एका बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
| Updated on: Nov 07, 2026 | 5:55 PM
Share

NCP MLA Anil Patil News:  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत केलेल्या  वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळाले. अजित दादा असते तर 12 फेब्रुवारीला विलिनीकरण झाले असते असं मोठे विधान सुनील तटकरेंनी केले होते. सुनील तटकरेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असतानाच राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणालेत अनिल पाटील? 

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. या संदर्भात सुनील तटकरे यांनी केलेले वक्तव्य हे आम्हालाच संभ्रपात पाडण्यासारखे आहे. अजित दादा गेल्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत विलिनीकरण होणार नाही असा निर्णय झाला होता. ज्यामुळे विलिनीकरणासंदर्भातील चर्चेला काहीही अर्थ नाही, असं अनिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सुनील तटकरे यांनी दादांसोबत अगोदर चर्चा केली असेल पण ती चर्चा आता पडद्याआड गेली आहे. त्यामुळे विलिनीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा नाही हे स्पष्ट आहे,” असंही ते म्हणाले.

यावेळी बोलताना अनिल पाटील यांनी प्रफुल पटेल आणि शरद पवार यांच्या भेटीवरही भाष्य केले. “प्रफुल्ल पटेल हे अजित दादा असताना त्यांच्यासोबत अनेक वेळा महत्त्वाच्या ठिकाणी भेटीसाठी घेत होते.आणि आता शरद पवार यांची तब्येत खराब असल्याने त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.त्यामुळे वेगळा काही चर्चेचा विषय नाही. आमचे हितचिंतक हे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत,” असं ते म्हणाले.

नरेंद्र मोदी अनेक भाषणांमध्ये सांगतात की शरद पवार हे माझे राजकीय गुरू आहेत. मिडिया माध्यमातून मला एकच प्रश्न विचारायचा आहे जर शरद पवार पक्ष हा विलीनीकरण होऊन सत्तेत येत असेल तर चांगली गोष्ट आहे. दोघांचे अनेक वर्षांपासून संबंध आहेत. शरद पवार यांना जर मोदी साहेबांचे नेतृत्व मान्य असेल तर ते त्यांचा पक्ष एनडीए सरकारमध्ये समावेश करून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकतात.विलीनीकरणाचा सर्वत् अधिकार वहिनींना आहे, असंही अनिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत...
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत वृक्षतोडीला विरोध
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला...
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच