AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या सीमेवर पाकिस्तानचा युद्धसराव, नेव्हीने थेट…समोर आलेल्या व्हिडीओ फुटेजमुळे चिंता वाढली!

कवायतीचा उद्देश अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातील संभाव्य समुद्री धोक्यांना सामोरे जाण्यासाठी पाकिस्तानची तयारी दाखवणे हा होता. या कवायतीमध्ये अबाबील एक्सरसाइजसह विविध नौदल सरावांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

भारताच्या सीमेवर पाकिस्तानचा युद्धसराव, नेव्हीने थेट...समोर आलेल्या व्हिडीओ फुटेजमुळे चिंता वाढली!
pakistan navy practiceImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 30, 2026 | 4:36 PM
Share

Pakistan Navy Karrar Exercise : पाकिस्तानी नौदलाने भारतीय सीमेजवळ मोठी लष्करी कवायत घेतल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान नौदलाने या कवायतीचा व्हिडिओही जारी केला असून, त्यामध्ये फ्लीट ऑपरेशन, कॉम्बॅट ट्रेनिंग आणि युद्धासाठीची तयारी दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये भारत-पाकिस्तानमधील वादग्रस्त सर क्रीक परिसरातील दृश्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या कवायतीच्या माध्यमातून भारताला थेट संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये पाकिस्तान नौदलाचे प्रमुख अॅडमिरल नावीद अशरफ हे KARRAR – The Relentless Striker या कार्यक्रमातील सरावाची पाहणी करताना दिसत आहेत. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 16 ते22 ऑगस्टदरम्यान बलुचिस्तान आणि सिंधच्या किनारी भागातील अनेक ठिकाणी या कवायती घेण्यात आल्या. यामध्ये पाकिस्तानी नौदलाची जहाजे, जवान तसेच मरीन कमांडोंनी सहभाग घेतला.

अरबी समुद्र आणि हिंदी महासागरावर लक्ष

CNN-News18 च्या वृत्तानुसार, या कवायतीचा उद्देश अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातील संभाव्य समुद्री धोक्यांना सामोरे जाण्यासाठी पाकिस्तानची तयारी दाखवणे हा होता. या कवायतीमध्ये अबाबील एक्सरसाइजसह विविध नौदल सरावांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तान आपल्या लष्करी कमांड स्ट्रक्चरमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानच्या संसदेत ऑगस्टमध्ये मंजूर करण्यात आलेला Defence Forces of Pakistan Act 2026 हा कायदा त्याचाच एक भाग आहे.

या नव्या व्यवस्थेनुसार चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस (CDF) यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैन्यांमध्ये अधिक समन्वय साधण्यात येईल. तसेच फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्याकडे लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कमांड स्ट्रक्चरमध्ये सर्वाधिकार येतील.

दरम्यान, सर क्रीकसारख्या संवेदनशील भागाचा कवायतीच्या व्हिडिओमध्ये समावेश झाल्याने भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचे आणि दोन्ही देशांमधील समुद्री सीमावादाचे मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तानच्या या लष्करी सरावाकडे कसे पाहणार हे पाहणे महत्त्वाच ठऱणार आहे.

Follow Us
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?