रशियाच्या युद्धनौका भारताच्या संरक्षणासाठी समुद्रात, शेजारी देशांची उडाली झोप, थेट..
इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात जगाचे लक्ष असताना भारताने मोठा खेळ खेळला. भारत आणि रशियात मोठा संरक्षण करार झाला. आता या कराराची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, यामुळे भारताच्या शेजारी देशांची झोप उडाली आहे.

भारत आणि रशियात संरक्षण संदर्भात एक ऐतिहासिक करार झाला. या करारानंतर पाकिस्तानची झोप उडाली. हेच नाही तर त्यांनी थेट रशियाबद्दल मोठे विधान केले. भारत आणि रशियाने या कराराची अंलबजावणीही सुरू होती. हा करार चीनसाठीही मोठा धक्का मानला जात आहे. भारत आणि रशियातील करारात दोन्ही एकमेकांची जमीन वापरू शकतात. युद्धनाैका आणि विमाने तैनात करण्याची परवानगी मिळते. रशियाच्या युद्धनाैका भारताचे संरक्षण करणार आहेत. यासोबतच 3000 हून अधिक सैनिक एकमेकांचे संरक्षण करू शकतात. हा ‘रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक्स सपोर्ट’ (RELOS) करार अशा वेळी झाला आहे, जेव्हा भारत रशियासोबतचे आपले संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहे. या करारामुळे भारत आणि रशियाचे संबंध अधिक चांगले झाले. भारत रशियातील सैन्यतळांचा वापर करू शकतो, रशिया देखील भारतीय सैन्य तळांचा वापर करू शकतो.
थेट रशिया आणि भारत एकमेकांचे संरक्षण करणार असल्याचे कळाल्यापासून पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तानी तज्ज्ञांनी या कराराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानी तज्ज्ञ डॉ. अतिया अली काझमी यांनी रशिया-भारत करारावर नाराजी व्यक्त केली. हेच नाही तर भारताच्या नादी रशियाने लागू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले की, मॉस्कोने चूक केली आहे. अमेरिकेने भारतावर विश्वास ठेवून त्याच्याशी संबंध सुधारले होते. पण आता त्यांनी भारतासोबतची भूमिका बदलली आहे. भारत आता रशियाचीही फसवणूक करेल. पाकिस्तानी तज्ज्ञांच्या मते, या प्रदेशातील उदयोन्मुख शक्ती भारत नाहीये. चीन हा या प्रदेशातील शक्ती आहे. त्यामुळे रशियाने चूक केली आहे.
रशियाच्या युद्धनाैका भारताचे संरक्षण करणार म्हटल्यावर अनेक देशांची झोप उडाली. अतिया यांनी पुढे म्हटले की, भारत कोणत्याही एका देशासाठी विशेष संतुलन बनण्याची कल्पना नाकारतो. भारताला अमेरिकेसोबत गुंतवणूक, चिनी वस्तू आणि रशियन घटक एकचवेळी हवीत आहेत. भारत आणि रशिया यांच्यातील करारानंतर पाकिस्तानची झोप उडाल्याचे बघायला मिळत आहे.