पाकिस्तानला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेने केले काश्मीरबद्दल मोठे विधान, थेट दणका, भारताचे..
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादाचा विषय कायमच काश्मीर ठरला आहे. काश्मीरच्या मुद्द्यात कोणत्याही देशाची मध्यस्थी स्वीकारली जाणार नसल्याची भूमिका भारताची आहे. त्यातच आता पाकिस्तानला मोठा धक्का अमेरिकेने दिला.

अमेरिकेकडून काश्मीरबद्दल एक असे विधान करण्यात आले, ज्यानंतर पाकिस्तानला मोठ्या मिरच्या लागल्या आहेत. पाकिस्तानला मोठा धक्का बसला. अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर नुकताच श्रीनगरच्या दाैऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकरांसोबत बोलताना म्हटले की, हा भारताचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. या विधानानंतर पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली. काही तासात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याचा जोरदार विरोध करत या विधानावर टीका केली. हे भाष्य अत्यंत चुकीचे असल्याचे पाकिस्तानने म्हटले. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही प्रतिक्रिया दिली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हताशा झाल्याने पाकिस्तानने अशी प्रतिक्रिया दिल्याचे भारताने म्हटले. थेट अमेरिकेकडून काश्मीरच्या मुद्द्यात पाकिस्तानला झटका देण्यात आला. पाकिस्तानचे पंख कापण्याचे काम आता अमेरिकेकडून केले जात आहे.
काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अत्यंत संवेदनशिल मुद्दा आहे. 1947 मध्ये विभाजन झाले. दोन्ही देश परमाणु संपन्न आहेत. तीन वेळा युद्ध आणि सैन्य झडपचे कारण काश्मीर राहिले आहे. अमेरिकेने काश्मीरच्या मुद्द्यात सावध भूमिका घेतली. भारत आणि पाकिस्तानने मध्यस्थी करून यातून मार्ग काढावा असे म्हटले आहे. त्यातच आता अमेरिकेकडून हे विधान आले.
अमेरिकेच्या राजदूतांनी दिलेल्या टिप्पणीनंतर पाकिस्तानची झोप उडाली. या विधानावरून दिसत आहे की, या मुद्द्यात अमेरिका भारताच्या बाजूने आहे. अमेरिकेची या मुद्द्यात बदललेली भूमिका इराण युद्धामुळे असावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करत होता. मात्र, दुसरीकडे इराणला मदत करताना पाकिस्तान दिसला.
काही दिवसांपूर्वीच भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध स्थिती निर्माण झाली. भारताच्या पहलगामवर पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात असलेले दहशतवादी अड्डे उद्धवस्थ केली. पाकिस्तानला पळता भुई कमी केली. त्यानंतर दोन्ही देशांकडून मोठे बॉम्ब हल्ले करण्यात आले. त्यावेळी अमेरिकेने तात्काळ युद्ध थांबवण्याचे दोन्ही देशांना सांगितले होते. आता काश्मीरबद्दल अमेरिकेची भूमिका बदलताना दिसत आहे.