AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीरज चोप्राला मोठा धक्का, एशियन गेम्सपूर्वी महत्त्वाची माहिती समोर; म्हणाला हे तर खूपच…

एशियन गेम्स 2026 स्पर्धेला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राचं या स्पर्धेतून आऊट झाला आहे. या नंतर त्याने आपल्या भावना व्यक्त करत दु:ख व्यक्त केलं आहे.

नीरज चोप्राला मोठा धक्का, एशियन गेम्सपूर्वी महत्त्वाची माहिती समोर; म्हणाला हे तर खूपच...
नीरज चोप्राला मोठा धक्का, एशियन गेम्सपूर्वी महत्त्वाची माहिती समोर; म्हणाला हे तर खूपच...Image Credit source: PTI
| Updated on: Aug 29, 2026 | 5:22 PM
Share

एशियन गेम्स 2026 स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान आयची आणि नागोया येथे होणार आहे. या स्पर्धेत विविध क्रीडाप्रकार होणार आहेत. यापैकी काही खेळांमध्ये भारताला पदक मिळणार हे निश्चित दिसत आहे. असं असताना खात्रीलायक पदकाच्या अपेक्षाला सुरूंग लागला आहे. कारण भारताचा दिग्गज भालाफेकपटू नीरज चोप्रा या स्पर्धेला मुकला आहे. दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. खरं तर या स्पर्धत आपलं सुवर्णपदक राखण्यासाठी नीजर उतरणार आहेत. पण या स्पर्धेपूर्वीचं त्याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इतकंच काय तर 5 सप्टेंबर रोजी प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीलाही मुकला आहे. या स्पर्धेत 88.05 मीटर लांब भालाफेक केल्यानंतर सरावादरम्यान त्याच्या घोट्यातील लिगामेंट फाटले आणि वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली आणि घाईघाईने मैदानात उतरण्याऐवजी पूर्णपणे बरं होण्याला प्राधान्य दिलं. त्यामुळे उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली.

काय म्हणाला नीरज चोप्रा?

नीरज चोप्राही या दुखापतीनंतर नाराज झाला आहे. त्याने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. नीरज चोप्रा म्हणाला की, ‘हे खूप निराशाजनक आहे, कारण मला वाटत होते की मी माझा जुना फॉर्म परत मिळवण्याच्या अगदी जवळ आलो आहे. असं म्हणतात की, अडथळे हा प्रवासाचाच एक भाग असतात. आता माझे संपूर्ण लक्ष योग्य पुनर्वसनावर असेल, जेणेकरून मी अधिक मजबूत होऊन मैदानात पुनरागमन करू शकेन.’

नीरज चोप्राने शुक्रवारी डायमंड लीग स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. पण आता अंतिम सामन्याला मुकला आहे. तर एशियन गेम्स स्पर्धेतही खेळू शकणार नाही.

नीरज चोप्रा आणि दुखापत

नीरज चोप्राला दुखापतीने ग्रासलं आहे. मे 2019 मध्ये त्याच्या उजव्या कोपराला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हा मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाला होता. त्यानंतर 2022 मध्ये कंबरेच्या खालत्या भागात दुखापत झाली होती. बर्मिंगहॅम येथे झालेल्या 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्समधून माघार घ्यावी लागली. 2023-2024 मध्ये हर्निया आणि ग्रोइनचा त्रासा झाला होता. सप्टेंबर 2024 हाताचे हाड फ्रॅक्चर झालं होतं. सप्टेंबर 2025 मध्ये पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे 9 महिने मैदानापासून दूर होता. त्यानंतर कमबॅक केलं आणि आता पुन्हा दुखापत झाली आहे.

Follow Us
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द,
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितलं...
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितला मोठा प्लॅन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, फडणवीसांनी केलं स्वागत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्वागत
शरद पवारांच्या पार्टीकडून 10 प्रवक्त्यांची घोषणा, कोणाला मिळाली संधी?
शरद पवारांच्या पार्टीकडून 10 प्रवक्त्यांची घोषणा, यादी आली समोर; कोणाला संधी मिळाली?
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; काय म्हणाले?
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; नेमकं काय म्हणाले?
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन