
भारत-पाकिस्तान तणावाने टोक गाठलं आहे. हा तणाव युद्धात बदलू नये हीच जगाला भिती आहे. पण काही अशा घडामोडी घडतायत, त्यामुळे युद्ध अटळ मानलं जात आहे. पाकिस्तानी संसदेत एक प्रस्ताव पास झाला आहे. यात भारताचा पाणी रोखण्याचा निर्णय आणि पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरण्याचा निषेध करण्यात आला आहे. प्रस्तावात भारताच्या पाणी रोखण्याच्या निर्णयाला युद्धाची कृती ‘Act of War’ मानण्यात आलं आहे. याचा अर्थ भारताच्या पाणी रोखण्याला युद्धाची सुरुवात मानलं गेलय. इथे भारतावर पाकिस्तानच्या धमक्यांचा काही परिणाम होत नाहीय. पाकिस्तानची हुक्का पाणी बंद करण्याची सगळी तयारी झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलय की, ‘पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली जाईल’
भारत सरकारने पंजाबमधून पाकिस्तानच्या दिशेने वाहणाऱ्या झेलम आणि चिनाब नदीच पाणी रोखण्यासाठी पावलं उचलली आहेत. काही बातम्यांनुसार भारताने काही प्रमाणात पाकिस्तानला जाणारं पाणी सुद्धा अडवलं आहे. पाणी आटल्यामुळे पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झेलम नदी कोरडी पडल्याच दिसत आहे. यामुळे पाकिस्तानी शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सॅटलाइट फोटोंमधून हे दिसतय. भारताच्या या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान पाण्यासोबत अन्नाच्या दाण्याला सुद्धा तरसणार आहे.
पाकिस्तानला जे अपेक्षित ते घडलच नाही
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरचा राग, संताप मी समजू शकतो असं संयुक्त राष्ट्राचे चीफ गुटेरेस म्हणाले. नागरिकांना टार्गेट करणं अमान्य आहे असं ते म्हणाले. दोन्ही देशांना सैन्य संघर्ष टाळण्याचा त्यांनी सल्ला दिला. संयुक्त राष्ट्राच्या या बैठकीत कुठल्याही देशाने पाकिस्तानचं पाणी रोखण्याच्या भारताच्या निर्णयाची निंदा केली नाही.