युद्धाचा पाकिस्तानाला सर्वात मोठा दणका, एका रात्रीत ही वस्तू खूपच महागली; लोकांमध्ये प्रचंड संताप!

सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धाचा भडका उडाला आहे. या युद्धामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तानात इंधन दरवाढीने सामान्य लोक त्रस्त झाले आहेत. भविष्यात काय घडणार? याची सर्वांनाच चिंता लागली आहे.

युद्धाचा पाकिस्तानाला सर्वात मोठा दणका, एका रात्रीत ही वस्तू खूपच महागली; लोकांमध्ये प्रचंड संताप!
pakistan fuel hike
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 08, 2026 | 3:32 PM

Pakistan Fuel Price Hike : सध्या इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. युद्धाचा भडका उडाल्यामुळे ईंधन पुरवाठा बंद झाला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे इंधनाची वाहतूक करणे मुश्कील झाले आहे. त्याचा फटका भारतालाही बसतोय. भारतात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 60 रुपयांनी वाढली आहे. युद्ध असेच चालू राहिले तर भविष्यात पेट्रोल, डिझेलचाही भाव वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतात सध्यातरी चिंताजनक स्थिती नाही. परंतु भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानत मात्र परिस्थिती खूपच बिघडली आहे. पाकिस्तानत इंधनाचा भाव चांगलाच वाढला असून लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. युद्धामुळे तेथील परिस्थिती जास्तच बिकट झाली आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

अगोदरच आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या पाकिस्तानची स्थिती जास्तच वाईट झाली आहे. पाकिस्तान सध्या राजकीय तसेच आर्थिक संकटातून जात आहे. असे असतानाच इराण-इस्रायल युद्धामुळे तेथील इंधनाचा भाव प्रचंड वाढला आहे. पेट्रोल आणि हाय स्पीड डिझेलची किंमत 55 पाकिस्तानी रुपयांनी वाढवण्यात आली आहे. अचानकपणे झालेली ही भाववाढ साधारण 20 टक्के असल्याचे बोलले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन महागल्याने तेथील सामान्यांची चिंता चांगलीच वाढली आहे. पाकिस्तानी नागरिक सध्या नाराजी आणि चिंता व्यक्त करत आहेत.

पेट्रोल, डिझेलचा सध्याचा भाव काय?

पाकिस्तानात हाय स्पीड डिझेलचा भाव अगोदर 280.86 पाकिस्तानी रुपये प्रति लिटरवर होता. हाच भाव आता 335.86 रुपये प्रति लिटर एवढा वाढला आहे. पेट्रोलचा अगोदरचा भाव 266.17 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर एवढा होता. आता हाच भाव 321.17 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर एवढा झाला आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात साधारण 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, या भावाढीमुळे पाकिस्तानात चिंता व्यक्त केली जात आहे. युद्धाची स्थिती अशीच कायम राहिली तर भविष्यात नेमकं काय होणार? पाकिस्तानची स्थिती आणखी वाईट होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us