Imran Khan : रात्री 2 वाजता लाइट कापून इमरान खान यांच्या बहि‍णींवर…पाकिस्तानातून धक्कादायक माहिती समोर

Imran Khan : इमरान खान यांच्या बहि‍णींना 12 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत त्यांना भेटू दिलं नाही. 18 नोव्हेंबरला धरणे आंदोलनाला बसलेल्या इमरान यांच्या बहि‍णींना तिथून हटवण्याचा प्रयत्न झाला. रस्त्यावर खेचण्यात आलं. माजी पंतप्रधानांच्या बहिणींसोबत असं वर्तन त्यानंतर इमरान यांच्या प्रकृतीबाबात काही अफवा पसरल्या होत्या. अखेर 4 डिसेंबरला इमरान खान यांची एक बहिण डॉ उज्मा खानम यांना त्यांना भेटण्याची परवानगी दिली.

Imran Khan : रात्री 2 वाजता लाइट कापून इमरान खान यांच्या बहि‍णींवर...पाकिस्तानातून धक्कादायक माहिती समोर
imran khan sisters
| Updated on: Dec 10, 2025 | 9:13 AM

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचं फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी अजिबात पटत नाही. त्यांचा विरोध करणं इमरान यांना खूप महाग पडतय. त्याचं आणखी एक उदहारण रावळपिंडीच्या आदियाला जेल बाहेर पहायला मिळालं. इमरान खान यांच्या बहि‍णी त्यांना आठवड्यातून एकदा भेटतात. त्यांची ही साप्ताहिक भेट होऊ दिली नाही. त्यानंतर इमरान यांच्या तीन बहिणी आणि त्यांच्या पक्षाचे समर्थक आदियाला जेलबाहेर प्रवेशद्वारापासून 50 मीटर अंतरावर बॅरिकेड जवळ 11 तास अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलनाला बसले. सध्या रावळपिंडीमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीत अर्ध्यारात्री वीज कापूर वॉटर कॅननचा प्रयोग करण्यात आला. पोलिसांच्या या क्रूर वर्तनात पीटीआयचे काही कार्यकर्ते जखमी सुद्धा झाले.

इस्लामाबाद हायकोर्टाच्य आदेशानुसार इमरान खान दरआठवड्यात एकदा मंगळवारी आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटू शकतात. त्या आदेशानुसारच नौरीन खानम नियाजी, अलीमा ख़ानम नियाज़ी आणि डॉ उज्मा ख़ानम या इमरान यांना भेटण्यासाठी मंगळवारी दुपारी 3.30 वाजता आदियाला तुरुंगात पोहोचल्या. पण तिघींना रावळपिंडीच्या गोरखपुर चौक बॅरिकेड जवळ अडवण्यात आलं. बॅरिकेडच्या विरुद्ध दिशेला शेकडोच्या संख्येने रावळपिंडी पोलीस तैनात होते. आदियाला तुरुंगाबाहेरचा रस्ता छावणीमध्ये बदलला आहे. जेणेकरुन पीटीआयचे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने तिथे पोहोचू नयेत. त्यावेळी इमरान खान यांच्या बहिणी अन्य कार्यकर्त्यांसोबत धरणे आंदोलनाला बसल्या.

इमरान खान कधीपासून तुरुंगात?

रात्री 2.20 च्या सुमारास इमरान खान यांच्या बहि‍णींसह पीटीआय कार्यकर्त्यांना हटवण्यासाठी रावळपिंडी पोलिसांनी 9 डिग्री सेल्सियस तापमानात अर्ध्या रात्री वॉटर कॅनने फवारणी सुरु केली. इमरान यांच्या बहिणी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तिथून माघार घ्यायला भाग पाडणं हा मुनीर-शहबाज सरकारचा डाव होता. इमरान खान हे वर्ष 2023 पासून रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात बंद आहेत. दर आठवड्याला त्यांचे कुटुंबीय त्यांना भेटायला जातात.

आसिम मुनीर-इमरान यांची दुश्मनी का वाढली?

इमरान त्यांच्या बहि‍णींच्या माध्यमातून तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संदेश जारी करतात. इमरान खान हे आधी शहबाज शरीफ आणि त्यांच्या सरकारवर टीका करायचे. पण मे महिन्यात आसिम मुनीर फिल्ड मार्शल बनले. त्यानंतर स्थिती बदलली. इमरान खान साप्ताहिक भेटीमध्ये शहबाज शरीफ यांच्याजागी आसिम मुनीरला टार्गेट करायला सुरुवात केली. देश हे फिल्ड मार्शल आसिम मुनीर चालवत आहेत, हे त्यांनी पाकिस्तानी जनतेला सांगायला सुरुवात केली. पाकिस्तानातील मानवधिकाराचे उल्लंघन आणि भ्रष्टाचाराचे जनक आसिम मुनीर आहेत.