पाकिस्तानात इमरान खान सरकारच्या अडचणी वाढल्या, अविश्वास ठराव मांडला जाण्याची शक्यता

पाकिस्तानात इमरान खान सरकारच्या अडचणी वाढल्या, अविश्वास ठराव मांडला जाण्याची शक्यता
इम्रान खान
Image Credit source: tv9

पाकिस्तानातील (Pakistan) इमरान खान (Imran Khan) सरकारसमोरील पेच प्रसंगाचा फैसला आज पार पडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये इमरान खान यांच्या सरकारविरोधात अविश्वास ठराव आज सांयकाळी 4 वाजता आणला जाणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Mar 28, 2022 | 3:21 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानातील (Pakistan) इमरान खान (Imran Khan) सरकारसमोरील पेच प्रसंगाचा फैसला आज पार पडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये इमरान खान यांच्या सरकारविरोधात अविश्वास ठराव आज सांयकाळी 4 वाजता आणला जाणार आहे. इमरान खान यांच्या सरकारविरोधातील पीएमएल-एन आणि जमियात इलेमा ए इस्लाम या पक्षांनी लाँग मार्च (Long March ) काढला आहे. विरोधी पक्षांनी पाकिस्तानच्या तहरिक ए इन्साफ या सत्ताधारी पक्षाविरोधात लाँग मार्च काढला आहे. इमरान खान यांच्या सरकारला महागाई आटोक्यात आणण्यास अपयश आल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी काढलेला लाँग मार्च आज इस्लमाबादपमध्ये पोहोचणार आहे. रविवारी इमरान खान यांनी एक मोठी रॅली काढली होती. त्या रॅलीला त्यांनी जलसा हे नाव दिलं होतं.

इमरान खान सरकार संकटात

पाकिस्तानी वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तांनुसार जम्हूरी वतन पार्टीच्या शाहजैन बगुती यांनी सत्ताधारी पक्षांच्या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीची सदस्यसंख्या 342 आहे. तर विरोधी पक्ष पीएमएल-क्यूकडे 163 सदस्यांचं समर्थन आहे. बलुचिस्तान अवामी पार्टी आणि मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तान च्या सरकारला पाठिंबा असलेल्या 17 सदस्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी इमरान खान यांचं सरकार संकटात अडकलं आहे.

इमरान खान यांच्यावर अविश्वास ठरावाची टांगती तलवार

इमरान खान यांच्या विरोधात नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास ठराव सादर झाल्यानंतर तीन ते सात दिवसांच्या काळात मतदान घ्यावं लागणार आहे. सत्ताधारी पीटीआयमधील नाराज असलेले खासदार स्वतंत्र विचार करुन निर्णय घेऊन पक्षाच्या भूमिकेबाहेर जाऊन मतदान केल्यास इमरान खान यांचं सरकार अडचणीत
सापडण्याची शक्यता आहे.

इमरान खान यांच्यासमोर पर्याय काय?

इमरान खान यांनी काल काढलेल्या रॅलीमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचं म्हटलं आहे. जर इमरान खान यांचं सरकार बहूमत कायम ठेऊ शकलं नाही तर विरोधी पक्षनेते शहबाज शरिफ यांच्या नेतृत्त्वातील सरकार स्थापन होऊ शकतं. मात्र, त्यापूर्वी इमरान खान संसद विसर्जित करण्याची आणि पुन्हा निवडणूक घेण्याची शिफारस करु शकतात.

इतर बातम्या:

Imran Khan : सरकार पाडण्यासाठी विरोधकांचं षडयंत्र, इम्रान खान यांचा आरोप; खान यांच्या भाषणातील 10 मुद्दे

Pakistan : इम्रान खान राजीनामा देण्याची शक्यता, अचानक 50 मंत्री गायब, पाकिस्तानात राजकीय भूकंप?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें