पाकिस्तानची भारताविरोधात मोठी खेळी, थेट चीनच्या दाैऱ्यावर शहबाज शरीफ, दोन..

Shehbaz Sharif China Visit : डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यानंतर आता थेट पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ थेट चीनच्या दाैऱ्यावर निघाले आहेत. मात्र, पाकिस्तानचा हा दाैरा भारताकरिता मोठी डोकेदुखी ठरू शकतो.

पाकिस्तानची भारताविरोधात मोठी खेळी, थेट चीनच्या दाैऱ्यावर शहबाज शरीफ, दोन..
Shahbaz Sharif to visit China
| Updated on: May 22, 2026 | 9:51 AM

संपूर्ण जगाचे लक्ष आता चीनकडे आहे. डोनाल्ड ट्रम्प काही दिवसांपूर्वीच चीनच्या दाैऱ्यावर आले. त्यानंतर लगेचच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन चीनच्या दाैऱ्यावर होते. त्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील चीन दाैऱ्यावर जाणार आहेत. 23 मे रोजी शाहबाज शरीफ चीन दाैऱ्यावर असतील. चीनने ज्यावेळी वाटले, त्यावेळी पाकिस्तानचा फायदा घेतला. त्यांना वाटले की, आता पाकिस्तानची आपल्याला काहीच गरज नाही, अशावेळी थेट त्यांना बाजूला सारले. काही मुद्द्यांमध्ये चीन आणि पाकिस्तान यांच्यात वाजले आहे. अमेरिकेच्या नादाला लागून पाकिस्तानने थेट चीनसोबत पंगा घेतला. पाकिस्तानला देखील चांगल्या पद्धतीने माहिती आहे की, चीनसोबत पंगा घेऊन आपले काहीच भले होणार नाही, त्यामुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा चीनचे पाय धरण्यास सुरूवात केली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुष्टी केली की, शहबाज शरीफ हे चीन दाैऱ्यावर येत आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ 23 ते 26 मे दरम्यान चीनचा दौरा करतील. शनिवार ते मंगळवार दरम्यान होणाऱ्या या दौऱ्याबद्दल बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सांगितले की, चीन आणि पाकिस्तानचे नेते द्विपक्षीय संबंध आणि समान हिताच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करतील. शरीफ यांच्या या दाैऱ्याकडे भारताची बारीक नजर असणार आहे.

Loading...

चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग भारत दाैऱ्यावर येणार असल्याची चर्चा आहे. सप्टेंबर महिन्यात शी जिनपिंग भारत दाैऱ्यावर असतील. गेल्या काही वर्षांचा विचार करता भारत आणि चीन यांच्यातील संबंध व्यवस्थित आहेत. सीमेवरही शांतता आहे. मात्र, भारत आणि चीन यांच्यात वाढत असलेली मैत्री किंवा ठिक संबंध राहणे कुठे ना कुठेतरी पाकिस्तानला बैचेन करणारे नक्कीच आहे.

त्यामध्येच आता पाकिस्तानचे पंतप्रधान थेट चीनच्या दाैऱ्यावर आहेत. अनेक मुद्द्यांमध्ये यादरम्यान चर्चा होईल. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धातही मध्यस्थी करण्याकरिता पाकिस्तानने पुढाकार घेतला. मात्र, त्यांना अजिबातच यश मिळाले नाही. त्यांना मोठे अपयश मिळाले. शिवाय पाकिस्तान अमेरिकेचाच गेम करताना दिसला. अमेरिकेने मध्यस्थीच्या भूमिकेतून पाकिस्तानला बाजूला सारले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us