Iran War Update : सौदी अरेबियासाठी युद्धात उतरण्याआधी इराणने पाकिस्तानचं असं नाक दाबलं की, आयुष्यात नाही विसरणार

Iran War Update : इराणचं इस्रायल-अमेरिकेविरोधात युद्ध सुरु आहे. या युद्धात पाकिस्तान उतरणार अशी चर्चा होती. पण त्याआधीच इराणने त्यांचं असं नाक दाबलय की, ते कधी विसरणार नाहीत. या युद्धाला आता तीन आठवडे उलटले आहेत.

Iran War Update : सौदी अरेबियासाठी युद्धात उतरण्याआधी इराणने पाकिस्तानचं असं नाक दाबलं की, आयुष्यात नाही विसरणार
shahbaz government
| Updated on: Mar 23, 2026 | 1:01 PM

पाकिस्तानात वाढत्या तेल किंमतींनी हाहाकाराची स्थिती निर्माण झालीय. इराण-इस्रायल युद्धामुळे अनेक देशात ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून होणारी तेल आणि गॅस वाहतूक इराणच्या रडारवर आहे. या युद्धामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचा डोलारा डगमगतोय. सॅलरी कपात, सरकारी खर्चांवर नियंत्रण त्यानंतर आता पाकिस्तानात पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत. पाकिस्तानात प्रत्येक लीटर तेलावर 200 रुपय टॅक्स वाढवण्यात आलाय. पाकिस्तान सरकारने हा टॅक्स लग्जरी वाहनातील हाय-ऑक्टेन इंधनावर लावला आहे. पाकिस्तान सरकारने हाय-ऑक्टेन इंधनावरील शुल्क 100 रुपयाने वाढवून 300 रुपये प्रति लीटर केलं आहे. इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध लवकर थांबलं नाही, तर पाकिस्तानची हालत आणखी खराब होईल. कारण त्यांच्याकडे काही दिवसाचच तेल शिल्लक आहे.

पाकिस्तानच्या पेट्रोलियम आयातीचा जवळपास 70 हिस्सा मिडिल ईस्टमधून येतो. इराण-इस्रायल युद्धामुळे जहाजांची होणारी वाहतूक बाधित झाली आहे. त्याचा परिणाम पुरवठ्यावर होतोय. स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये पाकिस्तानचे तेल आणि गॅस टँकर अडकले आहेत. इराण ते निघू देत नाहीय. त्यामुळे पाकिस्तानात ऊर्जा संकट दिवसेंदिवस गंभीर बनत चाललं आहे. परिस्थिती नाही सुधारली, तर पाकिस्तानची हालत आणखी वाईट होईल. सौदी अरेबियासोबत पाकिस्तानचा एक संरक्षण करार झाला आहे. त्यामुळे ते सौदीच्या रक्षणासाठी युद्धात उतरु शकतात अशी चर्चा होती.

पाकिस्तानकडे किती दिवसांचं इंधन शिल्लक?

पाकिस्तानात इंधन संकट यामुळे इतकं गंभीर झालय, कारण त्यांच्याकडे कुठलेही मोठे तेल भंडार नाहीयत. अशा स्थितीत पुरवठा थांबला तर पाकिस्तान स्वत:ला जास्त दिवस संभाळू शकत नाही. मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानात तेल आणि गॅस पुरवठा प्रभावित झालाय. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनुसार पाकिस्तानी रिझर्व्ह भंडारातील तेल आणि गॅस आता संपत चाललं आहे. आता सात दिवसांचं कच्च तेल, 17 दिवसांचं डिझेल, 20 ते 22 दिवसांचं पेट्रोल, 10 दिवसांचा जेट फ्यूलचा स्टॉक आणि 6 दिवसांचा एलपीजी रिझर्व्ह उरला आहे. अशा स्थितीत पाकिस्तानला तेल किंवा गॅस पुरवठा नाही झाला, तर त्यांची स्थिती अजून बिघडेल.

उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय

या ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने अनेक पावलं उचलली आहेत. पाकिस्तानच्या एआरवाय न्यूज नुसार पाकिस्तानने रविवारी हाय ऑक्टेन इंधनाच्या किंमतीत 200 पाकिस्तानी रुपयापर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे इंधन 100 रुपयावरुन 300 रुपये होईल. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us