पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर, शहरांनंतर आता गावही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

| Updated on: Feb 02, 2021 | 11:49 AM

गाव आणि शहरांमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये वेगवेगळ्या स्तरावर महागाई पाहायला मिळाली. यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळाली. स्‍टेट

पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर, शहरांनंतर आता गावही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर
Follow us on

इस्लामाबाद : आधीच पाकिस्तानची आर्थिक स्थिती तेवढी चांगली नाही (Pakistan Rural Areas Food Inflation). त्यात आता वाढत्या महागाईने पाकिस्तानच्या जनतेच कंबरडं मोडलं आहे. शहरच नाही तर आता गावांनाही याची झळ लागत आहे. पाकिस्तानच्या मीडियानुसार, 2020 च्या दुसऱ्या भागात पाकिस्तानचे गाव आणि शहरांमधील अंतर वाढलं आहे (Pakistan Rural Areas Food Inflation).

गाव आणि शहरांमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये वेगवेगळ्या स्तरावर महागाई पाहायला मिळाली. यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळाली. स्‍टेट बँक ऑफ पाकिस्‍तानच्या (एसबीपी) रिपोर्टमध्ये महागाईचे वाढलेले आकडे देण्यात आले आहेत.

खाण्या-पिण्याच्या गोष्टी महागल्या

एसबीपीच्या रिपोर्टनुसार, गेल्या 12 महिन्यांमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या दरात तेजी आली आहे. शहर आणि गाव दोघांनाही याची झळ बसली आहे. पण, गावात शहरापेक्षा जास्त महागाई रेकॉर्ड करण्यात आली आहे. एसबीपीच्या रिपोर्टनुसार, डिसेंबर 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 10.4 टक्क्यांनी वाढला आहे.

शहरात महागाईचा दर डिसेंबर 2020 मध्ये 13.3 टक्क्यांवर रिकॉर्ड झाला. 12 महिन्यात खाण्या-पिण्याच्या दरात 28 टक्के वाढ झाली आहे. डिसेंबर 2019 मध्ये जिथे गावात खाद्य पदार्थांच्या दरात 11.3 टक्के होतं. तर डिसेंबर 2020 मध्ये हा दर 16.2 टक्क्यांवर पोहोचला. गावात खाण्या-पिण्याच्या दरात 43 टक्क्यांची वाढ झाली.

वर्ल्ड बँकेने काय म्हटलं?

वर्ष 2018 मध्ये वर्ल्ड बँकेच्या एका रिपोर्टनुसार, गावांमध्ये शहरांच्या तुलनेत गरिबीत दुप्पट वाढ झाली आहे. गावात गरिबीचा दर 36 टक्क्यांवर पोहोचला. तर शहरात हा आकडा 18 टक्के होता. ग्रामीण भागातून खाण्या-पिण्याच्या गोष्टींची निर्यात होत असते. पण, वाढत्या महागाईने यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत (Pakistan Rural Areas Food Inflation).

गाव आणि शहरामधील अंतर वाढलं

डिसेंबर 2020 मध्ये ग्रामीण आणि शहरी परिसरात खाद्य महागाई दर 2.9 टक्क्यांवर होता. गावात महागाईचा दर 12.6 टक्के होता तर शहरात हा दर 13.3 टक्के होता. वर्ल्ड बँकेनुसार, पाकिस्तानच्या ग्रामीण भागातील 80 टक्के जनता ही गरिबी रेषेखाली राहण्यास मजबूर आहे.

रिपोर्टनुसार, महागाईच्या दराने गावात असलेल्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. आतापर्यंत पंतप्रधान इमरान खान सरकारकडून आतापर्यंत यासाठी कुठलीही उपाययोजना केलेली नाही.


Pakistan Rural Areas Food Inflation

संबंधित बातम्या :

ना तो फार बोलतो, ना शिकण्यात तेज होता, आता थेट म्यानमारमध्ये तख्तापलट करणाऱ्या जनरलची संपूर्ण कहाणी

‘या’ भीतीमुळे ब्रिटीनच्या राणीकडून 50 वर्षांपूर्वी ‘Royal Family’वरील माहितीपट बॅन, आता लिक…