Shehbaz Sharif : शहबाज शरीफ यांच्याकडून परदेशात सर्वात मोठी कबुली, पाकिस्तान किती वाजता हल्ला करणार होता?

Shehbaz Sharif : शहबाज यांचे हे शब्द ऐकताच कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाकिस्तानी टाळ्या वाजवू लागले. सिविलियन ड्रेसमध्ये आलेले आसिम मुनीर शाळकरी मुलाप्रमाणे लगेच उठून उभे राहिले. आसिम मुनीर उभे राहिल्यानंतर एर्दोगॉन आणि इल्हाम अलियेव सुद्धा टाळ्या वाजवू लागले. 'आसिम मुनीर मला म्हणाले की, भारताने पुन्हा हल्ला केलाय' असं शहबाज म्हणाले. शहबाज आसिम मुनीरच कौतुक करत होते. पण त्यांनी हे नाही सांगितलं की, भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे एअरबेस कसे उद्धवस्त झाले.

Shehbaz Sharif : शहबाज शरीफ यांच्याकडून परदेशात सर्वात मोठी कबुली, पाकिस्तान किती वाजता हल्ला करणार होता?
Shehbaz Sharif
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 29, 2025 | 10:52 AM

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून दारुण पराभव झाल्यानंतर परदेश दैऱ्यावर गेलेले पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ विचित्र हरकती करत आहेत. प्रत्येक ठिकाणी ते आम्ही भारताला जोरदार प्रत्युत्तर दिलं हे सांगत आहेत. आम्हाला युद्ध नको, असं सांगताना शहबाज परदेशी राष्ट्राध्यक्षांसमोर, आर्मी चीफ आसिम मुनीर त्यांच्या हातच बाहुल असल्यासारखं सादर करतात. आसिम मुनीरच्या कौतुकाचे पाढे वाचतात. बुधवारी अजरबैजानच्या लाचिन शहरात शहबाज शरीफ यांनी खूप नौटंकी केली. त्यावेळी तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगॉन आणि अजरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलियेव समोर उपस्थित होते.

शहबाज शरीफ भाषण देत होते. तुर्कीचे राष्ट्रपति एर्दोगॉन आणि अजरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलियेव आपल्या मंत्रिमंडळातील दुसऱ्यासदस्यांसह राउंड टेबलवर बसले होते. दुसऱ्या देशांचे राजदूतही तिथे होते. पाकिस्तानच संपूर्ण प्रतिनिधीमंडळ तिथे होतं. शहबाज शरीफ आपल्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकारी आणि लष्करप्रमुखांसह तुर्की, अजरबैजान आणि ताजिकिस्तान या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत.

सर्वांसमोर उभं राहण्यास सांगितलं

शहबाज शरीफ लष्करप्रमुख मुनीरच कौतुक करत होते. त्या दरम्यान शहबाज शरीफ यांनी अचानक फील्ड मार्शल आसिम मुनीरला सर्वांसमोर उभं राहण्यास सांगितलं. शहबाज म्हणाले ‘तुम्ही उभे राहा, जेणेकरुन या सर्व लोकांना मी तुमची ओळख करुन देईन’

पाकिस्तान किती वाजता हल्ला करणार होता?

पाकिस्तानी पीएम शहबाज शरीफ म्हणाले की, ,”लेडीज अँड जेंटलमॅन 9 आणि 10 मे च्या रात्री आम्ही भारताविरोधात मोजूनमापून प्रतिक्रिया देण्याचा निर्णय घेतला. आम्ही ठरवलं की, “फजरची नमाज झाल्यानंतर 4.30 च्या सुमारास पाकिस्तानी सैन्य, ज्याचं नेतृत्व फिल्ड मार्शल चीफ ऑफ आर्मी स्टाफ सैयद आसिम मुनीर यांच्याकडे आहे ते हल्ला करतील”

भारताने कुठे हल्ला केला ते सांगितलं

शहबाज शरीफ यांनी हे मान्य केलं की, पाकिस्तानी सैन्य फजरची नमाज झाल्यानंतर 4.30 वाजता हल्ला करणार होतं. पण त्याआधीच भारताने हल्ला केला. शहबाज एर्दोगॉन आणि इल्हाम अलियेव यांच्यासमोर म्हणाले की, “भारताने वेळ येण्याआधीच ब्राह्मोस मिसाइलने हल्ला चढवला. पाकिस्तानच्या अनेक राज्यात हल्ले झाले. यात रावळपिंडी एअरपोर्ट आणि दुसऱ्या जागा आहेत. आमचे चीफ ऑफ स्टाफ इथे पहिल्या रांगेत बसले आहेत. फील्ड मार्शल कृपया तुम्ही उभे राहा, जेणेकरुन या लोकांना मी तुमची ओळख करुन देईन…”