Donald Trump : पाकिस्तानी आसिफ ट्रम्प यांना संपवायला निघाला, कोर्टानं दिली अशी शिक्षा की…आता आयुष्यभर तुरूंगात रडत राहणार!

न्यूयॉर्कमधील ब्रुकलीन येथील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एरिक आर कोमिटी यांनी 17 नोव्हेंबर रोजी मर्चंट याला 330 महिने म्हणजेच 27 वर्षे सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. मार्च 2026 मध्ये न्यायालयाने दहशतवादी कटात सामील होण्याच्या आरोपात मर्चंट याला दोषी ठरवले होते

Donald Trump : पाकिस्तानी आसिफ ट्रम्प यांना संपवायला निघाला, कोर्टानं दिली अशी शिक्षा की...आता आयुष्यभर तुरूंगात रडत राहणार!
donald trump and asif merchant
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 5:43 PM

America Iran Clash : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अजूनही संपलेला नाही. पाकिस्तान या देशाकडून अमेरिका-इराण यांच्यातील वाद संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु अजूनही यात यश आलेले नाही. पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संंबंध गेल्या काही वर्षात सुधारले आहेत. दोन्ही देश एकमेकांना आपले मित्र समजत आहेत. दरम्यान, पाकिस्तान अमेरिकेला मित्र मानत असला तरी या देशाचा खरा चेहरा आता समोर आलाय. मूळचा पाकिस्तानी नागरिक असलेला आरोपी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याच्या कटात दोषी आढळलाय. त्याला तब्बल 27 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलीय.

इराणच्या इशाऱ्यावर करत होता काम

एकूण 27 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या या दोषी पाकिस्तानी नागरिकाचे नाव आसिफ मर्चंट असे आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या माहितीनुसार मर्चंट हा इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच आयआरजीसीच्या इशाऱ्यावर काम करत होता. आयआरजीसीच्या सूचनेनुसार मर्चंट याने ट्रम्प तसेच इतर अमेरिकन नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता.

Loading...

मर्चंटला सुनावली एकूण 27 वर्षांची शिक्षा

न्यूयॉर्कमधील ब्रुकलीन येथील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एरिक आर कोमिटी यांनी 17 नोव्हेंबर रोजी मर्चंट याला 330 महिने म्हणजेच 27 वर्षे सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. मार्च 2026 मध्ये न्यायालयाने दहशतवादी कटात सामील होण्याच्या आरोपात मर्चंट याला दोषी ठरवले होते. अमेरिकन न्याय विभागाच्या मतानुसार मर्चंट हा आयआरजीसीने प्रशिक्षण दिलेला गुप्तहेर होता. अमेरिकेत काही राजकीय हत्या घडवण्याच्या कटात तो सहभागी होता. त्याच्या या योजनेत डोनाल्ड ट्रम्प हे हिटलिस्टवर होते.

सुलेमानीच्या हत्येचा घ्यायचा होता बदला

ट्रम्प यांच्याव्यतिरिक्त अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन तसेच संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेचे माजी राजदूत निक्की हेली यांचीही हत्या करण्याचा मर्चंटचा कट होता. इराणी लष्करातील माजी कमांडर कासीम सुलेमानी याच्या हत्येचा बदला म्हणून हा कट रचण्यात आला होता. अमेरिकेने सुलेमानी याला जानेवारी 2020 मध्ये ड्रोन हल्ल्यात ठार केले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us