AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प पाकिस्तानला जाणार नाहीत…,अमेरिकेकडून पोलखोल, पाकिस्तानी मीडियाने मागितली माफी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सप्टेंबरमध्ये पाकिस्तानला भेट देण्याची शक्यता आहे, अशी बातमी पाकिस्तान माध्यमांनी दिली. त्यानंतर जिओ न्यूजला या बातमीनंतर माफीनामा द्यावा लागला. ट्रम्प यांच्या दौऱ्याबाबत सत्यता न पडताळता बातमी प्रसारित केल्याबद्दल जिओ न्यूजकडून माफी मागण्यात आली.

ट्रम्प पाकिस्तानला जाणार नाहीत...,अमेरिकेकडून पोलखोल, पाकिस्तानी मीडियाने मागितली माफी
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 18, 2025 | 8:01 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सप्टेंबरमध्ये पाकिस्तानला भेट देण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी माध्यमांमध्ये गुरुवारी ही बातमी प्रसिद्ध झाली. पाकिस्तानच्या दोन प्रमुख वृत्तवाहिन्या जिओ न्यूज आणि एआरवाय न्यूजने हा दावा केला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या इतर अनेक माध्यम संस्थांनीही हे वृत्त प्रकाशित केले. अमेरिकेकडून त्यावर तातडीने स्पष्टीकरण करण्यात आले. व्हाईट हाऊसने या वृत्ताचे खंडन केले आहे. शेवटी पाकिस्तानकडून हे वृत्त मागे घेण्यात आले. जिओ न्यूजला माफीनामा द्यावा लागला.

जिओ न्यूजकडून माफीनामा

सध्या पाकिस्तान माध्यमांकडून विविध प्रकारच्या बातम्या पेरल्या जात आहेत. पाकिस्तानच्या दोन प्रमुख वृत्तवाहिन्या जिओ न्यूज आणि एआरवाय न्यूजने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली. त्या बातमीनुसार, ट्रम्प सप्टेंबरमध्ये पाकिस्तानला भेट देण्याची योजना आखत आहेत. यानंतर पाकिस्तानच्या इतर अनेक माध्यम संस्थांनीही हे वृत्त प्रकाशित केले.

जिओ न्यूजला या बातमीनंतर माफीनामा द्यावा लागला. ट्रम्प यांच्या दौऱ्याबाबत सत्यता न पडताळता बातमी प्रसारित केल्याबद्दल जिओ न्यूजकडून माफी मागण्यात आली. एआरवाय न्यूजच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांनी ट्रम्प यांच्या भेटीचे ठिकाण मागे घेतले. दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आम्हाला ट्रम्प यांच्या दौऱ्याबाबत काहीच माहिती नाही, असे म्हटले होते. त्यामुळे पाकिस्तानमधील माध्यमे तोंडघशी पडले.

व्हाईट हाऊसकडून वृत्त फेटाळले

पाकिस्तानमधील अनेक वृत्तवाहिन्यांनी डोनाल्ड ट्रम्प 18 सप्टेंबर रोजी पाकिस्तान दौरा करण्याची शक्यता आहे, असे म्हटले होते. त्यानंतर ते भारतातही जाऊ शकतात, असे या बातम्यांमध्ये म्हटले गेले होते. व्हाइट हाऊसकडून या बातम्यांचे त्वरित खंडन करण्यात आले. व्हाईट हाऊसने म्हटले की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तान दौरा निश्चित झाला नाही. त्यानंतर इस्लामाबादमधील अमेरिकन दूतावासातील प्रवक्तानेही ट्रम्प यांच्या दौऱ्याबाबत आमच्याकडे काहीच माहिती नसल्याचे म्हटले.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट