
नेपाळमध्ये हाहा:कार सुरू आहे. तरुण पिढी सरकारविरुद्ध भयंकर हिंसक निदर्शने करत आहे. पंतप्रधानांच्या घरात घुसून धुमाकूळ घालण्यात आलाय तर काही मंत्र्यांना थेट रस्त्यावर काढून त्यांना जमावाने मोठी मारहाण केली. सध्याच्या स्थितीला नेपाळमधील स्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक नेत्यांनी देश सोडून पळ काढलाय. नेपाळमध्ये परिस्थिती पूर्ण बदलली आहे. मोठ्या गदारोळानंतर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. लष्कराने हातात कायदा सुव्यवस्था हातात घेतलीये. हेच नाही तर नेपाळच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये भारताने अलर्ट मोड जारी केलाय. सीमा भागात सुरक्षा वाढवली आहे. नेपाळमधील नागरिकांना शांत राहण्याचे आव्हान केले जातंय. नेपाळमधील सध्याच्या परिस्थितीवर भारतात मोठी बैठक पार पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, निदर्शक आणि सुरक्षा दलांमधील संघर्षात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. 500 हून अधिक लोक हे जखमी आहेत. संसदेला निदर्शकांनी आग लावली. अनेक मंत्र्यांच्या घरांना देखील टार्गेट करण्यात आले. या परिस्थितीमध्ये अनेक देशांनी आपल्या नागरिकांना नेपाळमध्ये सध्या जाणे टाळण्यास सांगितले. मंगळवारी तरुणांनी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाला टार्गेट करत आग लावली.