डोनाल्ड ट्रम्प भयंकर अडकले, त्या फोटोने जगात भूकंप, थेट बिकिनीवरील लहान मुलगी ट्रम्प यांच्या..

डोनाल्ड ट्रम्प यांचे अध्यक्षपद धोक्यात आले असून जेफ्री एपस्टीनचे कागदपत्र पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. या फाईलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचेही काही फोटो पुढे आले असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प भयंकर अडकले, त्या फोटोने जगात भूकंप, थेट बिकिनीवरील लहान मुलगी ट्रम्प यांच्या..
Donald Trump Jeffrey Epstein Photos
| Updated on: Dec 20, 2025 | 2:12 PM

अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित जवळपास तीन हजार कागदपत्रे प्रसिद्ध केली. ज्यामुळे जगातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित लोकांचेही फोटो पुढे आल्याने एकच खळबळ उडाली. अमेरिकेत तर भूकंपच आला. अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचाही फोटो यात आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेते, उद्योगपती, अर्थक्षेत्रातील बड्या लोकांची धक्कादायक फोटो आली. माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप गायक मायकल जॅक्सन, राजदूत, खासदार, राजपूत्र यासोबतच यात अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही फोटो पुढे आली. या फाईलवर स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी सही केली होती. आता ही कागदपत्रे प्रसिद्ध झाल्यानंतर यात घोळ असल्याचा दावा केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य फोटो प्रसिद्धच झाले नसल्याचा दावा केला जात आहे.

यादरम्यान जेफ्री एपस्टीनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे काही फोटो पुढे आली आहेत. त्यापैकी एका फोटोमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे एका बाकावर बसले असून त्यांनी फक्त टॉवेल गुंडाळली आहे. त्यांच्या बाजूलाही एक व्यक्ती बसलेला असून तो देखील अर्धनग्न दिसत आहे. या फोटोमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी डोळ्यांना गॉगल लावल्याचे दिसत असून ते पाय पुढे करून मस्त बसले आहेत.

यावेळी एक लहान वयाची मुलगी बिकिनीवर दिसत आहे. ही मुलगी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाय साफ करून मालिश करताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प हे मुलीकडे बघू हसताना दिसत आहे. फोटोवरून ही मुलगी रशियन वाटत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या व्हायरल फोटोमुळे मोठी खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांना अशा अवस्थेत पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.

डोनाल्ड ट्रम्प यांचे पाय साफ करणारी मुलगी अगदी कमी वयाची दिसत आहे. ती मुलगी बिकिनीवर असल्याचेही स्पष्टच आहे. या व्हायरल फोटोमुळे तूफान राडा झाला. तरीही असा दावा केला जात आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांचे खरे फोटो अजूनही जगापुढे आली नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा फोटो पहिल्यांदाच जगापुढे आला आहे. या प्रकरणाच्या फाईलवर स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनीच सही केली आणि त्यांचेच अर्धनग्न फोटो व्हायरल झाली.