AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे हा तर बावळटपणा राव… डोनाल्ड ट्रम्प यांना थेट वाचवले?, एपस्टीन कागदपत्रांमध्ये मोठी गडबड..

Epstein Files : एपस्टीन कागदपत्रे पुढे आली असून मोठी खळबळ उडाली आहे. काही प्रतिष्ठित लोकांचे धक्कादायक फोटो व्हायरल झाली आहेत. मात्र, आता असा दावा केला जात आहे की, या फाईलमधील पूर्ण सत्य बाहेर आलेच नाही.

अरे हा तर बावळटपणा राव...  डोनाल्ड ट्रम्प यांना थेट वाचवले?,  एपस्टीन कागदपत्रांमध्ये मोठी गडबड..
Epstein Files Donald Trump
| Updated on: Dec 20, 2025 | 12:09 PM
Share

अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित हजारो कागदपत्रे प्रसिद्ध केली. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेत तर भूकंपच आला. या भूकंपाच्या झळा थेट ब्रिटनपर्यंत जाऊन पोहोचल्या. हैराण करणारे म्हणजे थेट अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचाही फोटो यात आलाय, ज्यामुळे ते पुलमध्ये मुलींसोबत वेळ घालवताना दिसत आहे. सुरूवातीला असा दावा करण्यात आला की, अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही या प्रकरणात नाव आहे आणि त्यांचेही खळबळ उडवणारे फोटो आहेत. मात्र, नुकताच प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांमध्ये आणि फोटोंंमध्ये डोनाल्ड ट्रम्प गायब असल्याचे दिसतंय. यामुळे आता असा दावा केला जात आहे की, जेफ्री एपस्टीनचे कागदपत्रे पुढे आली आहेत, मात्र त्यामध्ये काहीतरी मोठा झोल आहे.

जेफ्री एपस्टीन कागदपत्रांच्या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांनीच सही केली होती आणि त्यानंतर हे सत्य जगापुढे आले. मात्र, ज्या डोनाल्ड ट्रम्प यांचा वारंवार या प्रकरणात उल्लेख केला जात होता, ते मात्र दूर आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, एपस्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी कायद्यांतर्गत न्याय विभागाला दोषी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित फाइल्स प्रसिद्ध करणे आवश्यक होते. एपीच्या वृत्तानुसार, या फाईल्समध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे देखील छायाचित्रे समाविष्ट आहेत.

मात्र, व्हाईट हाऊससमोर एपस्टीनसोबतच्या कथित संबंधांबाबत अद्याप कोणतेही नवीन खुलासे पुढे आली नाहीत. जर हे फोटो पुढे आले असते तर डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्राध्यक्षपद धोक्यात आले असते, असे सांगितले जाते. यामुळे जगासमोर इज्जत जाण्याऐवजी डोनाल्ड ट्रम्प यांना या प्रकरणात वाचवण्यात आल्याची चर्चा आहे. काही रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले की, एपस्टीनचे संबंध थेट पुढे आल्यानंतर व्हाईट हाऊस आणि प्रशासन काही महिन्यांपासून ते दाबत होते.

सिद्ध केलेल्या फाइल्समध्ये ट्रम्प यांचे काही फोटो समाविष्ट आहेत. ज्यात ट्रम्प आणि एपस्टीन फेब्रुवारी 2000 मध्ये, त्यांच्या मैत्रीत कटुता येण्यापूर्वी, ट्रम्प यांच्या पाम बीच येथील ‘मार-अ-लागो’ क्लबमधील एका कार्यक्रमात सध्याच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत पोज देताना दिसत आहेत. मात्र, हे फोटो व्हायरल झाल्यानंतर असे सांगितले जात आहे की, ट्रम्प यांचे खरे फोटो जगापुढे आलेच नाहीत.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.