Iran War Update : इराणच्या मदतीसाठी भारतातील या भागातील लोकांकडून दागिने, तांबा-पितळेची भांडी, पैशांचं भरभरुन दान

Iran War Update : अमेरिका-इस्रायलने इराण विरुद्ध सुरु केलेलं युद्ध आता धोकादायक वळणावर आलय. युद्धाला तीनपेक्षा जास्त आठवडे झालेत. पण इराण हार मानायला तयार नाहीय. इराणचं सुद्धा मोठं नुकसान होत आहे. आता भारतातील एका भागातून इराणच्या मदतीसाठी लोक पुढे आले आहेत.

Iran War Update : इराणच्या मदतीसाठी भारतातील या भागातील लोकांकडून दागिने, तांबा-पितळेची भांडी, पैशांचं भरभरुन दान
Iran War Donation
Image Credit source: ANI
| Updated on: Mar 23, 2026 | 9:40 AM

जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये लोकांनी इराणच्या समर्थनार्थ एक मोठ पाऊल उचललं आहे. लोकांनी सोनं, चांदी आणि रोख रक्कम दान करुन तिथल्या प्रभावित लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. पश्चिम आशियात युद्ध सुरु आहे. सर्वसामान्य लोक त्रस्त आहेत. त्यावेळी जम्मू-काश्मीरच्या बडगाममधले लोक इराणच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. बडगाममध्ये लोक एका ठिकाणी एकत्र जमले. त्यांनी दागिने आणि पैसे दान केले. ANI न्यूज एजन्सीच्या फोटोंमध्ये हे दिसलं. संकटात अडकलेल्या लोकांना मदत व्हावी यासाठी तिथल्या लोकांनी हा निर्णय घेतला.

“आम्ही मशिदीत इमाम ज़मानमध्ये पैसा जमा करण्याच्या एका चांगल्या इराद्याने स्टॉल लावला आहे. आमच्या माता-बहिणी त्यांचे दागिने, पैसे, तांबा दान करत आहेत. सद्य स्थितीत इराणला मदत करण्यासाठी आम्ही हे सर्व करतोय” असं बडगाममधील मोहसीन अली बोलला.

बडगामचे आमदार काय बोलले?

बडगाममधील आमदार मुंतज़िर मेहदी यांनी सुद्धा इराणच्या लोकांसोबत उभं राहणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. ‘मी माझा एक महिन्याचा पगार दान करणार आहे. कठीण काळात माणूसकी सर्वप्रथम येते’ असं मुंतज़िर मेहदी म्हणाले.

दूर-दूर पर्यंत परिणाम

जम्मू-काश्मीरमधील या उपक्रमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या संघर्षाचा दूर-दूर पर्यंत परिणाम होत असल्याचं यातून दिसतं. वेगवेगळ्या ठिकाणी लोक आपल्या पद्धतीने मदत करतायत. सोबतच शांततेच सुद्धा आवाहन करण्यात येतय.

F-15 फायटर जेट पाडल्याचा दावा

अमेरिकेला युद्धात काल एक धक्का बसला. इराणने हॉर्मुज बेटाजवळ अमेरिकेचं F-15 फायटर जेट पाडल्याचा दावा केला. इराणची सरकारी न्यूज एजन्सी Fars News Agency ने हा दावा करताना एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला. एअर डिफेन्स सिस्टिमद्वारे या विमानाला लक्ष्य केल्याचं दिसत आहे. ही कारवाई ‘ट्रू प्रॉमिस 4’ मोहिमेचा भाग असल्याचं इराणकडून सांगण्यात आलय.

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध दिवसेंदिवस अजून भीषण बनत चाललं आहे. काल इराणने इस्रायलच्या अणू प्रकल्पावर हल्ला केला. या मिसाइल हल्ल्यात इस्रायलमधील अनेक नागरिक जखमी झाले.

 

 

Follow Us