
बांगलादेशमध्ये विमान दुर्घटना घडली आहे. हवाई दलाचे प्रशिक्षण विमान सोमवारी दुपारी ढाका येथील उत्तर भागातील एका शाळेच्या परिसरात कोसळले आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणि काहीजण जखमी झाले आहेत अशी माहिती लष्कर व अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
F-7 BGI हे विमान ढाकाच्या उतारा भागातील माइलस्टोन स्कूल आणि कॉलेजच्या परिसरात दुपारी कोसळले आहे. शाळेत मुले उपस्थित असताना ही दुर्घटना घडली आहे. बांगलादेश सैन्याच्या जनसंपर्क कार्यालयाने एका संक्षिप्त निवेदनात पुष्टी केली की कोसळलेले F-7 BGI विमान हे हवाई दलाचे होते. अग्निशमन दलाते अधिकारी सांगितले की किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वीही घडली होती घटना
यापूर्वी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोइंग 787-8 विमान कोसळून अपघात झाला आहे. या प्रवाशी विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यामध्ये अनेक विदेशी प्रवासीही सामील होते. हे विमान लंडनला जात होते, परंतु टेकऑफनंतर अगदी 15 मिनिटात विमानाचा अपघात झाला. एअर इंडियाच्या बोइंग 787-8 विमानात 242 प्रवासी होते, ज्यामध्ये 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी होते. यामध्ये केवळ एका प्रवाशाचा जीव वाचला होता.
बांगलादेशी माध्यमांनुसार, हवाई दलाचे FT-7BGI हे एक प्रशिक्षण विमान आहे. इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या मते, लढाऊ विमानाने दुपारी १:०६ वाजता उड्डाण केले आणि दुपारी १:३० वाजता ते अपघातग्रस्त झाले. हजरत शाहजहां आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अपघाताची पुष्टी केली आहे. या अपघातात पायलटचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
विमान तीन मजली इमारतीवर आदळले
द डेली स्टारने माइलस्टोन कॉलेजच्या शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, लढाऊ विमान माइलस्टोन कॉलेज कॅम्पसमधील तीन मजली इमारतीवर आदळले. त्यांनी सांगितले की, जेव्हा हा अपघात झाला तेव्हा ते महाविद्यालयाच्या १० मजली इमारतीत उभे होते, तर लढाऊ विमान जवळच्या तीन मजली इमारतीवर आदळले, त्यानंतर गोंधळ उडाला. विद्यार्थी इमारतीत अडकले. महाविद्यालयाचे शिक्षक आणि कर्मचारी त्यांना वाचवण्यासाठी धावले आणि लवकरच लष्कराचे जवान पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले. शिक्षकांच्या मते, इमारतीतील अनेक विद्यार्थी गंभीरपणे भाजले होते.