Plane Crash: आणखी एक विमान कोसळलं, Video पाहून अंगावर येईल काटा

गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. आता इटलीत एक विमान कोसळे आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Plane Crash: आणखी एक विमान कोसळलं, Video पाहून अंगावर येईल काटा
Itly Plane Crash
| Updated on: Jul 23, 2025 | 9:47 PM

गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. आता इटलीत एक विमान कोसळे आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हायवेवरून अनेक वाहने जाताना दिसत आहेत. यात मोठ्या वाहनांचा आणि कारचाही समावेश आहे. अशाचत एक छोटे विमान रस्त्यावर कोसळल्याचे दिसत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रहदारी असलेल्या रस्त्यावर विमान कोसळते. हे विमान जमिनीवर आदळताच मोठी स्फोट होतो आणि भीषण आग लागते. यामुळे एक वेगाने जाणारी कार देखील भीषण आगीत अडकते. मात्र काही सेकंदानंतर ही कार या आगीतून बाहेर पडत. या विमानात दोन लोक होते आणि दोघांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

या विमान अपघातामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. या अपघातात दोन लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी अपघाताची चौकशी सुरू झाली आहे आणि या अपघाताची कारणे शोधली जात आहेत.

य़ा घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्यासाठी तातडीने घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत विमानातील लोकांचा मृत्यू झाला होता. बचाव पथकाने तातडीने जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. सध्या परिसर रिकामा करण्यात आला आहे, तसेच या अपघातामुळे फटका बसलेल्या वाहनांचीही माहिती घेतली जात आहे.

बांगलादेशातही हवाई दलाचे विमान कोसळले

दोन दिवसांपूर्वी बांगलादेशातही एक विमान अपघात झाला होता. एका शाळेच्या परिसरात एक F-7 BGI हे लष्करी विमान कोसळले होते. या अपघातात 17 मुलांसह किमान 31 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात मृतदेह जळाल्याने मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.

अहमदाबादमध्ये विमान अपघात

जूनमध्ये अहमदाबादमध्ये लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. यात 269 लोकांचा मृत्यू झाला होता. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांमध्ये हे विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळले होते. या घटनेतील मृतांमध्ये ब्रिटनच्याही काही लोकांचा समावेश होता.