
पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरीशसच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी मॉरीशसचे राष्ट्राध्यक्ष धरमबीर गोखूल आणि त्यांच्या पत्नीशी हितगुज केली. यावेळी मोदी यांनी पितळेच्या आणि तांब्याच्या भांड्यात महाकुंभचे पाणी भेट दिले. बिहारचे सुपरफूड मखाना देखील मोदींनी त्यांना भेट दिला. तसेच मिसेस राष्ट्राध्यक्षांना बनारसी साडी देखील भेट दिली. बनारसी साडी ही सांस्कृतिक वारशाचे प्रतिक आहे. यात उत्तम प्रतीचे रेशम, ब्रोकेड आणि मनमोहक जरीचे नाजूक काम केलेले आहे. राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला जी साडी मोदी यांनी भेट दिली त्या सोबत गुजरातहून आणलेला साडेली बॉक्स देखील आहे.यात कोरीव काम केले आहे. या संदुकला महागड्या साड्या आणि दागिन्यांना ठेवण्यासाठी वापरले जाते.
मंगळवारी दुपारी पीएम मोदी दोन दिवसांच्या मॉरीशस दौऱ्यावर पोहचले आहे. मॉरीशसचे राष्ट्राध्यक्ष गोखुल यांची भेट घेण्याआधी मोदी यांनी मॉरीशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी सर शिवसागर रामगुलाम बॉटनिकल गार्डनमध्ये रोपे देखील लावले.
Pm Modi Mauritius Visit
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरीशसचे संस्थापक सर शिवसागर रामगुलाम, माजी राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या समाधीवर त्यांनी पुष्प देखील अर्पण केले. एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीनचंद्र रामगुलाम यांच्या सोबत सर शिवसागर रामगुलाम बॉटनिकल गार्डन येथे आपण गेलो. हे बॉटनिकल गार्डन सुंदर आहे. येथे जैवविविधतेचे रक्षण केलेले आहे. जी मॉरीशसच्या वनस्पतींचा वारसा आणि जतन करण्याच्या प्रयत्नांना दर्शवते.
Pm Modi Mauritius Visit
पंतप्रधान यांनी लिहीले की मी माझे मित्र पंतप्रधान डॉ.नवीन रामगुलाम यांच्या ‘एक पेढ माँ के नाम’ या मोहिमेत मला सहभाग घेता आला, म्हणून मी भावूक झालो आहे. हा निसर्ग, मातृत्व आणि स्थैर्याबद्दल आभार प्रकट करण्याचा अनोखा उपक्रम आहे. त्याचे समर्थन एक हरित तसेच चांगल्या भविष्यासाठी आमच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
“मॉरीशस में यादगार स्वागत भइल”
अन्य एका पोस्टमध्ये पीएम मोदी लिहीतात, “मॉरीशस में यादगार स्वागत भइल, सबसे खास रहल गहिरा सांस्कृतिक जुडाव, जवन गीत-गवई के प्रदर्शन में देखे के मिलल. ई सराहनीय बा कि महान भोजपुरी भाषा मॉरीशस के संस्कृती में आजुओ फलत-फूलत बा और मॉरीशस के संस्कृति में अबहियो जीवंत बा” अशा भोजपुरी भाषेत पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.