
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच कुवैत दौरा पार पडला. कालच दोन दिवसीय दौरा आटोपून पंतप्रधान मोदी भारतात परतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुवैत दौरा खास होता. कारण 43 वर्षानंतर कुवैत दौऱ्यावर जाणारे पंतप्रधान मोदी पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. त्यांच्याआधी फक्त इंदिरा गांधी यांनी 1981 साली कुवैतचा दौरा केला होता. आखाती देशांमधील कुवैत हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कुवैत दौऱ्यात ‘विसम मुबारक अल-कबीर’ किंवा ‘ऑर्डर ऑफ मुबारक दे ग्रेट’ या कुवैतच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलं. कुवैतचे एमीर शेख मीशाल अल-अहमद अल-जाबीर अल-साबह यांनी पंतप्रधान मोदींना या पुरस्कराने सन्मानित केलं. हा पुरस्कार काय आहे? आणि पंतप्रधान मोदींना तो मिळाला, यामागच महत्त्व काय? हे समजून घ्या. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांना तसच राज परिवारातील सदस्यांना कुवैत सरकार ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर’ पुरस्काराने सन्मानित करते....