अँटिग्वा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन घोटाळेबाज मेहुल चोक्सी पसार?

| Updated on: May 25, 2021 | 2:42 PM

पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळयातील सूत्रधार मेहुल चोक्सी हा अँटिग्वा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याचं वृत्त आहे. (PNB scam: Mehul Choksi goes missing in Antigua)

अँटिग्वा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन घोटाळेबाज मेहुल चोक्सी पसार?
Mehul Choksi
Follow us on

अँटिग्वा: पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळयातील सूत्रधार मेहुल चोक्सी हा अँटिग्वा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याचं वृत्त आहे. ही खबर मिळताच सीबीआयने अँटिग्वा दुतावासाशी संपर्क साधला असून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, चोक्सी बेपत्ता झाल्याच्या वृत्ताला सीबीआयने दुजोरा दिलेला नाही. (PNB scam: Mehul Choksi goes missing in Antigua)

मेहुल चोक्सी गायब झाल्याने त्याचे कुटुंबीय चिंतीत आहेत, अशी माहिती चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी दिली. या प्रकरणी अँटिग्वा पोलीस चौकशी करत आहे. मेहुल चोक्सी हा बेटावरील दक्षिणेकडील एका प्रसिद्ध रेस्तराँमध्ये डिनरसाठी गेला होता. त्यानंतर त्याला कुणीही पाहिले नाही, असं अग्रवाल यांनी सांगितलं.

चोक्सीच्या फोटोसह निवेदन जारी

चोक्सी हा अँटिग्वा आणि बारबुडा येथे राहत होता. त्याचा पोलीस रविवारपासून शोध घेत आहेत. पंजाब नॅशनल बँकेतील 13,500 कोटीच्या फसवणुकीच्या प्रकरणातील चोक्सी हा आरोपी आहे. तो जानेवारी 2018पासून अँटिग्वात राहत आहे, असं रॉयल पोलीस फोर्सने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. पोलिसांनी चोक्सीच्या फोटोसहीत हे निवेदन जारी केलं आहे. लोकांना त्याच्या बाबतीत माहिती मिळावी आणि तो कुठे दिसला तर पोलिसांशी संपर्क साधावा म्हणून पोलिसांनी त्याच्या फोटोसहीत हे निवेदन जारी केलं आहे. जॉन्सन पॉईंट पोलीस ठाण्यात चोक्सी गायब झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

कारमध्ये शेवटचं पाहिलं

चोक्सीला रविवारी एका कारमध्ये शेवटचं पाहण्यात आलं. ही कार पोलिसांनी जप्त केली आहे. मात्र, त्याचा काही पत्ता लागलेला नाही. पोलीस चौक्सीचा शोध घेत आहे. तो गायब झाल्याची शक्यता आहे, असं पोलीस आयुक्त अॅटली रॉड याने सांगितल्यांच अँटीगा न्यूज रुम या स्थानिक न्यूज मीडियाने स्पष्ट केलं आहे.

नीरव लंडनच्या तुरुंगात

चोक्सी जानेवारी 2018मध्ये भारतातून पसार झाला होता. त्यानंतर 2017मध्ये कॅरेबियन बेटावरील अँटिगा आणि बारबुडा या देशाचे त्याने नागरिकत्व घेतलं. आपला भाचा नीरव मोदीसोबत त्याने पंजाब नॅशनल बँकेतील 13,500 कोटी लंपास केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नीरव लंडनच्या एका तुरुंगा शिक्षा भोगत आहे. या प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे. (PNB scam: Mehul Choksi goes missing in Antigua)

 

संबंधित बातम्या:

नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; UK न्यायालयाचा मोठा निर्णय

नीरव मोदीला मुंबई हायकोर्टाचा दणका, महागड्या गाड्या, घड्याळ आणि चित्रांचा लिलाव

सूर्यकुमार यादवचं डेअरिंग, सूर्या जेव्हा विराट कोहलीला भर मैदानातच भिडला

(PNB scam: Mehul Choksi goes missing in Antigua)