सूर्यकुमार यादवचं डेअरिंग, सूर्या जेव्हा विराट कोहलीला भर मैदानातच भिडला

भारताचा युवा फलंदाज सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) काही दिवसांपूर्वीच इंग्लंडविरोधात टी-20 फॉर्मेटमध्ये भारतीय संघात प्रवेश केला.

  • Updated On - 1:30 pm, Tue, 25 May 21 Edited By: SachinP
सूर्यकुमार यादवचं डेअरिंग, सूर्या जेव्हा विराट कोहलीला भर मैदानातच भिडला
सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली

मुंबई : भारताचा युवा फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आयपीएल 2020 मधील काही आठवणींना उजाळा दिला. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) दरम्यानच्या सामन्यात सूर्या आणि कोहली यांच्यातील वादाबद्दल त्याने भाष्य केलं. त्या सामन्यात आरसीबीच्या 165 धावांचा पाठलाग करताना मुंबईकडून सूर्याने एकाकी झुंज देत नाबाद 79 धावा ठोकल्या होत्या. यावेळी सूर्याचे लक्ष विचलित करण्यासाठी विराट कोहलीने (Virat Kohli) त्याला डिवचले होते, सूर्यानेही यावेळी कोहलीकडे कटाक्षाने पाहत चोख प्रत्युत्तर दिलं होतं. याच अनुभवाच्या आठवणींना सूर्याने एका ऑनलाईन मुलाखतीत उजाळा दिला. (Suryakumar Yadav reveals about Virat Kohli staring incident in MI vs RCB IPL)

‘कोहलीने स्लेजिंग केल्याचा आनंद’

मुंबई इंडियन्सच्या इन्स्टाग्रामवरील एका Live दरम्यान सूर्याने हा अनुभव शेअर केला. तो म्हणाला, ”मला आनंद आहे की विराटने माझे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. कारण याचा अर्थ कोहलीला माहित होते की मी असाच खेळत राहिलो तर सामना आम्हीच जिंकू, त्यामुळे त्यांची रणनीती म्हणून त्याने मला डिवचण्याचा प्रयत्न केला.”

दुबईतल्या गर्मीमुळे वातावरण तापले

सूर्यकुमार म्हणाला, ”सामन्यात मी आणि कोहली एकमेंकाकडे रागाने पाहत होतो, त्याचे कारण तेथील उष्ण वातावरण होते. सामना अत्यंत चुरशीने सुरु होता, त्यातच दुबईतील वातावरणातही गर्मी असल्याने आमच्यातील वातावरण तापले. अन्यथा मी कोहलीला खूप मानतो.”

सलामीच्या सामन्यातच अर्धशतक

मागील काही वर्षे आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केल्यानंतर अखेर सूर्यकुमारसाठी भारतीय संघाची दारं उघडली. त्याला इंग्लंडविरोधी टी-20 सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. त्याने आपल्या खेळीची सुरुवातच षटकाराने करत धडाकेबाज अर्धशतक ठोकले. विशेष म्हणजे कोहलीसोबत जबरदस्त भागीदारी करत त्याने संघाला विजयही मिळवून दिला.

 सूर्यकुमार यादवची कारकीर्द

सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये आतापर्यंत 108 सामन्यात 2197 धावा केल्या आहेत. IPL 2020 मध्ये त्याने 16 सामन्यात 480 धावा केल्या होत्या. तर यंदाची आयपीएल स्थगित होण्यापूर्वी त्याने सात सामन्यात 173 धावा ठोकल्या . दुसरीकडे भारतीय संघाकडून तीन टी-20 सामन्यांत त्याने 89 धावा केल्या आहेत.

संबंधित बातम्या 

IPL 2021 : आयपीएलचे राहिलेले सामने आमच्या देशात नको, तिकडे UAE ला जा   

इंग्लंडच्या एका निर्णयावर IPL 2021 चं भवितव्य अवलंबून, BCCI च्या ‘या’ प्रस्तावाला ECB साद देणार? 

(Suryakumar Yadav reveals about Virat Kohli staring incident in MI vs RCB IPL)