Imran Khan : 17 दिवस आधीच इमरान खान यांची तुरुंगात हत्या? ‘या’ 3 कारणांमुळे अफवा, कुटुंबीयांना भेटण्यास का दिला जातोय नकार?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय पक्षाचे संस्थापक इमरान खान यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कुटुंबीयांना भेट घेण्यास नकार दिला जात आहे. यामागचं कारण काय, इमरान खान यांच्या मृत्यूच्या अफवा का पसरली आहे, याविषयी सविस्तर जाणून घ्या..

ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात कैद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना दीड वर्षापूर्वी शेवटचं पाहिलं गेलं होतं. दोन महिन्यांपूर्वीही ते एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहणार होते, परंतु त्यातही त्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसला नव्हता आणि त्यांचा आवाजही व्यवस्थित ऐकू येत नव्हता. त्यानंतर या महिन्यात इमरान यांना भेटण्यासाठी गेलेल्या बहिणींनाही वाईट वागणूक देण्यात आली. त्यानंतर अफवांचं साम्राज्यच पसरलं आहे. 17 दिवसांपूर्वीच तुरुंगात इमरान यांची हत्या झाल्याचे दावे केले जात आहेत. परंतु अदियाला तुरुंग प्रशासनाने इमरान खान पूर्णपणे निरोगी आणि स्वस्थ असल्याचं म्हटलं आहे. या सर्व घडामोडींबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इमरान यांच्या हत्येच्या दाव्याला काही आधार आहे का? लष्करप्रमुख असीम मुनीर हे इमरान यांचे कट्टर शत्रू का बनले आहेत? इमरान यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू का देत नाहीयेत? असे सवाल उपस्थित होत आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.. ...
