AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story: बापाने नारळ विकून शिकवलं, मुलगी बनली उपजिल्हाधिकारी, वाचा प्रियाचा प्रेरणादायी प्रवास

SDM Priya Agrawal : प्रियाने कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या जोरावर गगनभरारी घेतली आहे. मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC) 2023 च्या परीक्षेत तिने राज्यात सहावा क्रमांक मिळवला आहे. ती आता लवकरच उपजिल्हाधिकारी पद स्वीकारणार आहे.

Success Story: बापाने नारळ विकून शिकवलं, मुलगी बनली उपजिल्हाधिकारी, वाचा प्रियाचा प्रेरणादायी प्रवास
SDM Priya Agrawal
| Updated on: Nov 09, 2025 | 6:50 PM
Share

अनेक गरीब घरातील मुलांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्याचे तुम्ही ऐकले असेल. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील प्रिया अग्रवाल ही तरूणीही यातील एक आहे. प्रियाने कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या जोरावर गगनभरारी घेतली आहे. मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC) 2023 च्या परीक्षेत तिने राज्यात सहावा क्रमांक मिळवला आहे. ती आता लवकरच उपजिल्हाधिकारी पद स्वीकारणार आहे. प्रियाच्या या यशामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तिची प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊयात.

वडील प्रसादाचे दुकान चालवतात

प्रिया ही सतना जिल्ह्यातील बिरसिंहपूर शहरातील रहिवासी आहे. प्रियाचे वडील विजय अग्रवाल प्रसिद्ध गायविनाथ शिव मंदिराजवळ प्रसाद आणि नारळाचे एक छोटेसे दुकान चालवतात. त्यांना मर्यादित पासे मिळतात. या परिस्थितीत प्रियाने कठोर परिश्रम करत आपले अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यामुळे तिच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आहेत. MPPSC मध्ये टॉप 10 मध्ये स्थान मिळवणे हे तिच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. प्रियाने याआधी रीवा जिल्ह्यात जिल्हा कामगार अधिकारी म्हणूनही काम केलेले आहे, आता ती थेट उपजिल्हाधिकारी बनली आहे.

सहाव्या प्रयत्नात मिळाले मोठे यश

प्रिया अग्रवालने 2018 मध्ये एमपीपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती. सुरुवातीला तिला अपयश मिळाले, मात्र तिने मेहनत सुरु ठेवली. आता सहाव्या प्रयत्वात ती राज्यातून सहाव्या क्रमांकाने पास झाली आहे. या यशामागे कठोर परिश्रम, कुटुंबाचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हे खरे कारण आहे असं तिने सांगितले. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ति जेव्हा घरी परतली तेव्हा संपूर्ण शहरात आनंदोत्सव साजरा केला जात होता, लोकांनी ढोल-ताशांच्या गजरात हार घालून तिचे स्वागत केले.

तरुणांसाठी प्रेरणा

प्रिया अग्रवालच्या या यशामुळे राज्यासह देशभरातील लाखो तरूणांना प्रेरणा मिळाली आहे. जे तरूण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांनी खचून न जाता अभ्यास सुरू ठेवावा. कारण कितीही संकटे आली तरी शेवटी मेहनत करणाऱ्याला फळ नक्की मिळते हे प्रियाच्या या प्रेरणादायी प्रवासातून स्पष्ट झाले आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.