IPL 2026 : लिलावासाठी फ्रेंचायझीकडे किती पैसे? कोणत्या खेळाडूंवर लावणार बोली? 10 संघांचं गणित समजून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी दहा फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. इतकंच काय तर ट्रेड विंडोच्या माध्यमातून देवाणघेवाणही झाली आहे. आता संघ परिपूर्ण करण्यासाठी लिलावातच बोली लावावी लागणार आहे. चला जाणून घेऊयात फ्रेंचायझी संघातील उणीव कशी दूर करणार ते..

आयपीएल 2026 स्पर्धेच्या मिनी लिलाव 16 डिसेंबर रोजी दुबईत पार पडणार आहे. या लिलावासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. फ्रेंचायझींनी रिलीज केलेल्या खेळाडूंची यादीही जाहीर केली आहे. खरं तर काही महागडे खेळाडू रिलीज करून त्यांना पुन्हा कमी भावात घेण्याची रणनीतीही असू शकते. आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, डेविड मिलर, रवि बिश्नोई, महीश तीक्षणा आणि वानिंदु हसरंगा या सारख्या दिग्गज खेळाडूंना रिलीज केल्याने मिनी लिलावात रस्सीखेच पाहायला मिळेल. मिनी लिलावात कोणता खेळाडू सर्वाधिक भाव खाऊन जाईल याबाबतही उत्सुकता आहे. चला जाणून घेऊयात प्रत्येक संघाला लिवात काय हवं आणि त्यांची रणनिती काय असू शकते? ...
