Explainer : 12 हजार वर्षांनी त्या ज्वालामुखीचे तांडव, पृथ्वीवर काय परिणाम पडणार; काय फायदा होणार? तोटा काय?
सध्या इथिओपियात एक ज्वालामुखी चांगलाच सक्रीय झाला आहे. या ज्वालामुखीतून निघालेली राख हजारो किलोमीटरचे अंतर कापून थेट भारतापर्यंत आली आहे. त्यामुळेच ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर नेमके काय होते, मानवजातीला त्याचा किती धोका आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

Haley Gubbi Volcano Eruption : पृथ्वीच्या पोटातून कधी काय बाहेर निघेल हे सांगता येत नाही. पृथ्वीच्या पोटात अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत. याच गोष्टींचा वैज्ञानिक आजदेखील शोध घेत आहेत. कधीकधी पृथ्वीच्या पोटातून असं काहीतरी बाहेर निघतं, जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. सध्या इथियोपिया देशात तब्बल 12 हजार वर्षांनी एक ज्वालामुखी सक्रिय झाला आहे. या ज्वालामुखीमुळे निर्माण झालेला धुर लाल समुद्राला पार करून थेट पाकिस्तान आणि भारतापर्यंत आला आहे. आता हाच धूर चीनच्या दिशेने जात आहे. याच कारणामुळे हा ज्वालामुखी नेमका काय आहे? या ज्वालामुखीने जगाचे लक्ष का वेधून घेतले आहे? ज्वालामुखी सक्रीय झाल्यानंतर काय धोके निर्माण होतात? यासह ज्वालामुखीचे नेमके काय फायदे आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…. ...
