AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयफोनपेक्षा कमी किमतीत वनप्लसने लाँच केला त्यांचा दमदार बॅटरी पावर असलेला स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

OnePlus ने त्यांचा नवीन परवडणारा फोन लाँच केला आहे, जो 8300mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 चिपसेटसह येतो. यात 50MP OIS कॅमेरा आणि 16GB पर्यंत LPDDR5x रॅम देखील आहे. चला तर मग वनप्लसचा हा परवडणारा फोन तुम्ही कोणत्या किंमतीत खरेदी करू शकता तसेच स्पेसिफिकेशन, फिचर्स याबद्दल जाणून घेऊयात.

आयफोनपेक्षा कमी किमतीत वनप्लसने लाँच केला त्यांचा दमदार बॅटरी पावर असलेला स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत
OnePlus launches SmartphoneImage Credit source: OnePlus
| Updated on: Dec 05, 2025 | 2:22 AM
Share

चीनी स्मार्टफोन ब्रँड OnePlus ने त्यांचा नवीन परवडणारा फोन लाँच केला आहे. यात 8300mAh ची मोठी बॅटरी, स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 चिपसेट आणि 165Hz AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन अनेक स्टोरेज प्रकारांमध्ये आणि फ्लॅट-पॅनल डिझाइनमध्ये उपलब्ध आहे. तर या फोनमध्ये तुम्हाला IP66, IP68, IP69 आणि IP69K सारखे उच्च दर्जाचे धूळ आणि पाणी प्रतिरोधक रेटिंग देखील मिळणार आहेत. कॅमेरा सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 50MP चा प्राथमिक लेन्स समाविष्ट आहे. तर आजच्या लेखात आपण या स्मार्टफोनची किंमत स्पेसिफिकेशन आणि फिचर्स जाणून घेऊयात.

OnePlus Ace 6T ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने चीनमध्ये OnePlus Ace 6T लाँच केला आहे. ज्याची सुरुवातीची किंमत CNY 2,599 भारतीय चलनानुसार अंदाजे 33,000 रुपये आहे. ही किंमत 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेलसाठी आहे. त्याच्या 16GB/256GB व्हेरिएंट असलेल्या फोनची चीनमध्ये किंमत CNY 2,899 भारतीय चलनानुसार 36, 936 इतकी आहे. तर 12GB/512GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत CNY 3,099 म्हणजेच भारतीय चलनानुसार 39, 484 आहे. 16GB/512GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत CNY 3,399 भारतीय चलनानुसार 43,307 इतकी आहे आणि 16GB/1TB व्हेरिएंटची किंमत CNY 3,699 भारतीय चलनानुसार 47,129 आहे. लाँच ऑफरचा भाग म्हणून 200 युआनची सूट देखील दिली जात आहे.

हा फोन फ्लॅश ब्लॅक, फ्लीटिंग ग्रीन आणि इलेक्ट्रिक व्हायलेट रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. हा फोन भारतात OnePlus 15R म्हणून लाँच होऊ शकतो.

डिस्प्ले आणि परफॉर्मन्स स्पेसिफिकेशन्स

OnePlus Ace 6T मध्ये 165Hz रिफ्रेश रेट आणि 1,800 nits ब्राइटनेससह 6.83-इंचाचा फुल-एचडी+ AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित ColorOS 16 वर चालतो. फोनला पॉवर देण्यासाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 चिपसेट आहे, जो 16GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजसह येतो.

कॅमेराही दमदार

या फोनच्या मागील बाजूस OIS सपोर्ट असलेला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/1.8 अपर्चर आहे. याच्यासोबत 112-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू असलेला 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेन्स आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. रिअर कॅमेरा 120 फ्रेम प्रति सेकंद पर्यंत 4K व्हिडिओ शूट करू शकतो, तर फ्रंट कॅमेरा 30 फ्रेम प्रति सेकंद पर्यंत 1080 पी व्हिडिओ सपोर्ट करतो.

बॅटरी, फिचर्स आणि कनेक्टिव्हिटी

OnePlus Ace 6T ची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची 8,300mAh बॅटरी, जी 100W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह येते. सुरक्षिततेसाठी, यात इन-डिस्प्ले 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, Wi-Fi 7, NFC, USB Type-C, GPS, Beidou, GLONASS आणि Galileo यांचा समावेश आहे. हा फोन IP66, IP68, IP69 आणि IP69K प्रमाणित आहे, ज्यामुळे तो धूळ आणि पाणी प्रतिरोधक बनतो.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.