मुलगा असावा तर असा, आई-वडिलांना असं Gift दिलं, इंटरनेटवर जिंकली लाखो मनं, VIDEO तुफान व्हायरल
इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओने लाखो मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. असं काय आहे यात?

मुंबईत आपलं स्वत:च हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. काहीजण ही स्वप्न स्वत: पुरती पाहतात, तर काहीजण इतरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतात. आशिष जैन या मुलाने असच आपलं आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. आई-वडिलांनी त्याच्या घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांना वाटलं की, आपण भाड्याच्या घरात आलो आहोत. पण जेव्हा त्याने प्रॉपर्टीचे पेपर्स आणि नावाची नेमप्लेट आई-वडिलांच्या हातात दिली, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. हे सगळे क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत आहेत. आई-वडिल आणि मुलामधील या भावनिक क्षणाने सगळ्या इंटरनेटला जिंकून घेतलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
नवीन तयार फ्लॅटमध्ये आशिष जैन त्याच्या आई-वडिलांसोबत उभा असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतय. त्याच्या आई-वडिलांनी घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांना वाटलं की, आपण एका भाड्याच्या घरात आलो आहोत. पण आशिष जैनने त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. त्याने सांगितलं की, घराच्या दारावरील नेमप्लेट आणि कराराची कागदपत्र तुमच्या नावे आहेत. सुरुवातीला त्याच्या पालकांना अजिबात विश्वास बसला नाही.
त्यांनी मुलाला प्रेमाने मिठी मारली
त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूपच बोलका आणि भावना स्पर्श करणाऱ्या होत्या. त्याच्या वडिलांनी त्याला घट्ट मिठी मारली. वडिलांनी त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं व आनंदाने त्याने डान्सही केला. त्याच्या आईसाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का होता. त्या शांतच होत्या. आईच्या डोळ्या आनंदाश्रू तरळले. त्यांनी मुलाला प्रेमाने मिठी मारली.
View this post on Instagram
भावना शुद्ध सोन्यासारख्या
आशिषने त्याच्या आई-वडिलांच्या हातात घराच्या चाव्या ठेवल्या आणि म्हणाला हे घर तुमचं आहे. ‘त्यांचा आनंद सर्वकाही’ असं आशिषने या व्हिडिओला कॅप्शन दिलय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ हिट झालाय. अशा पद्धतीने आई-वडिलांचा आदर केल्याबद्दल सोशल मीडियावर आशिष जैनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ही कृती अनेक आई-वडिलांचं स्वप्न असते असं सुद्धा अनेक युझर्सनी म्हटलं आहे. हजारोंनी कमेंट्स येत आहेत. त्याच्या वडिलांच्या भावना शुद्ध सोन्यासारख्या आहेत. आईची Reaction अमुल्य आहे असं दुसऱ्या युजरने लिहिलय.
