Nostradamus Predictions : 2026 मध्ये या शहरातून वाहणार रक्ताचे पाट, येणार महाभयंकर संकट, नॉस्ट्राडेमसचं हादरवणारं भाकीत
आता लवकरच नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे, नवं वर्ष कसं असणार याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता असते, त्यातच आता 2026 संदर्भातील एक महाभयंकर भविष्यवाणी समोर आली आहे, ज्यामुळे जगात खळबळ उडाली आहे.

आता लवकरच नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे, नव्या वर्षाला सुरुवात होण्यासाठी अवघे, 27 दिवस बाकी राहिले आहेत. नवं वर्ष आपल्यासाठी कसं असणार? नव्या वर्षामध्ये काय-काय घडणार? राज्यात, देशात, जगभरात काय-काय घडामोडी घडणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. दरम्यान बाबा वेंगा आणि नॉस्ट्राडेमस हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध भविष्यवेत्ते होते, त्यांनी आपल्या काळात पुढील हजारो वर्षांमध्ये काय होणार याचं भाकीत तेव्हाच व्यक्त केलं होतं. आता मायकल नॉस्ट्राडेमस यांनी 2026 मध्ये काय घडणार याचं जे भाकीत वर्तवलं होतं, ते समोर आलं आहे, या भाकीतामुळे जगभरात खळबळ उडाली असून, यावर जे विश्वास ठेवतात, त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मायकल नॉस्ट्राडेमस यांनी 2026 मध्ये काय -काय घडणार आहे? याबाबतची संपूर्ण भविष्यवाणी आपलं पुस्तक लेस प्रोफेटिजमध्ये केलं आहे.मायकल नॉस्ट्राडेमस यांचा जन्म फ्रान्समध्ये 14 डिसेंबर 1503 मध्ये झाला होता, तर मृत्यू 1566 मध्ये झाला. मायकल नॉस्ट्रॉडेमस यांनी जी काही भाकीतं केली आहेत, त्यातील अनेक भाकीत खरी ठरली असल्याचा दावा करणारा जगात एक मोठा वर्ग आहे. जरी आता नॉस्ट्रॉडेमस हे जिंवत नसले तरी देखील त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये पुढील हजारो वर्षांचं भाकीत लिहून ठेवलं आहे, त्यातच आता 2026 मध्ये नेमकं काय कय घडणार आहे? याबद्दल त्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. नॉस्ट्राडेमस यांच्या या भाकीतामुळे सध्या जगभरात चिंतेचं वातावरण आहे.
या देशात रक्ताचे पाट वाहणार
नॉस्ट्राडेमस यांच्या भाकीतानुसार स्वित्झर्लंडमधील टिचिनो शहरावर या वर्षी फार मोठं संकट येणार आहे, या शहरातून रक्ताचे पाट वाहतील असं भाकीत त्या काळात नॉस्ट्राडेमस यांनी करून ठेवलं आहे, हे स्वित्झर्लंडमधील सर्वात सूंदर शहर असून, या शहराला तलाव आणि झऱ्यांचं शहर म्हटलं जातं, या ठिकाणी उंच-उंच बर्फाचे डोंगर देखील पहायला मिळतात, मात्र नॉस्ट्राडेमस यांनी या शहराचा आपल्या पुस्तकात का उल्लेख केला आहे, आणि इथे नेमकी कोणती घटना घडणार आहे? याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.
तिसर महायुद्ध होणार?
नॉस्ट्राडेमस यांच्या भाकीतानुसार 2026 मध्ये एक महाभयंकर युद्ध होणार आहे, या युद्धामध्ये सर्वच महाशक्ती देश सहभागी होतील, प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी होईल. हे युद्ध सात महिने चालेल असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांचं हे भाकीत समोर आल्यानंतर हे कदाचित तिसऱ्या महायुद्धाचे संकेत असू शकतात, अशा चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
