ही दारू म्हणजे दुसरं औषधच? गोव्यात आहे तुफान फेमस; एवढी प्रसिद्ध का झाली?
तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रातील एका राज्यात बनवली जाणारी दारु ही औषध म्हणून घेतली जात होती. या दारुमुळे शरीरातील अनेक ठिकाणांचे दुखणे कमी होते. पण आता हीच दारु राज्यातील प्रसिद्धस ड्रिंक ठरली आहे. आता ही दारु कोणती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सुंदर समुद्रकिनारे, चमकदार नाइटलाइफ, ऐतिहासिक चर्च आणि चविष्ठ जेवण हे महाराष्ट्रातील गोवा या राज्यात मिळते. अनेकजण गोव्याला सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी, धकाधकीच्या जीवनातून थोडे रिलॅक्स होण्यासाठी जातात. पण या राज्याची आणखी एक खास ओळख आहे ती म्हणजे तिथली पारंपरिक दारू ‘फेणी.’ खास सुगंध आणि तिखट चव यामुळे प्रसिद्ध असलेली फेणी फक्त नशा आणणारं पेय नाही, तर गोव्याच्या संस्कृती आणि वारशाचा अविभाज्य भाग आहे. ज्याप्रमाणे दार्जिलिंगची चहा, कोल्हापूरची चप्पल, आग्र्याचा पेठा आणि मथुरेचा पेढा प्रसिद्ध आहे, तसेच गोवा फेणीसाठी ओळखला जातो. तांत्रिकदृष्ट्या याला देशी दारू किंवा ताडीच्या श्रेणीत टाकले तरी फेणीचा दर्जा यापेक्षा खूप मोठा आहे. यामागे 500 वर्षांचा इतिहास आहे. इतिहासापेक्षा आणखी रंजक आहे ती पारंपरिक बनवण्याची पद्धत, ज्याची खरी रेसिपी आजही गोव्याच्या काही निवडक कुटुंबांकडेच सुरक्षित आहे. ...
