AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता तुमच्या बजेटमध्ये खरेदी करा रियलमीचा स्वस्त 5G फोन, 7000mAh बॅटरी आणि VC कूलिंगसह झाला लाँच

15 ते 20 हजार रूपयांच्या बजेटमध्ये नवीन फोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी या सेगमेंटमध्ये Realme कंपनीने नवीन फोन लाँच केला आहे. तसेच या सेगमेंटमधील इतर फोनमध्ये VC कूलिंग फीचर मिळणार नाहीये, जो तुम्हाला या फोनमध्ये मिळेल. चला जाणून घेऊया की तुम्हाला या फोन कोणत्या किंमती खरेदी करता येणार आहे.

आता तुमच्या बजेटमध्ये खरेदी करा रियलमीचा स्वस्त 5G फोन, 7000mAh बॅटरी आणि VC कूलिंगसह झाला लाँच
Realme
| Updated on: Dec 04, 2025 | 8:55 PM
Share

आपल्यापैकी अनेकजण आज ही बऱ्याच वर्षापुर्वीचा जुना फोन वापर असतात. त्यामुळे या फोनमधील बॅटरी लहान असल्याने तुम्हाला या फोनला वारंवार चार्ज करावा लागतो. सतत चार्ज केल्याने बॅटरी लाईफ कमी होते. पण आता तुम्ही मोठी दमदार बॅटरी असलेला फोन तेही तुमच्या बजेट मध्ये शोधत असाल, तर Realme ने मिड-रेंज सेगमेंटमध्ये Realme P4x 5G लाँच केला आहे, ज्यामध्ये 7000mAh बॅटरी आहे. या हँडसेटमध्ये केवळ मोठी बॅटरीच नाही तर उत्कृष्ट कामगिरीसाठी वेगवान चिपसेट देखील आहे. चला जाणून घेऊया या Realme फोन तुम्ही कोणत्या किमतीत खरेदी करू शकता ते जाणून घेऊयात.

या फोनची किंमत इतकी कमी आहे की इतर कोणतीही कंपनी VC कूलिंग सह या किमतीत फोन विक्री करणार नाही. तथापि हा Realme फोन VC कूलिंगसह येतो. हे कूलिंग फिचर्स फोन जेव्हा जास्त गरम होतो तेव्हा त्याला 0 थंड करण्यास मदत करतो.

Realme P4x 5G ची भारतातील किंमत

Realme च्या या बेसिक 6GB/128GB व्हेरिएंटची किंमत 15,499 रुपये आहे. तर टॉप-एंड 8GB/128GB असलेल्या फोनची किंमत 16,999 रूपये इतकी आहे आणि 8GB/256GB व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे.

Realme P4x 5G चा हा फोन या स्मार्टफोनला देणार टक्कर

15 ते 20 हजार रुपयांच्या किमतीच्या या रेंजमध्ये हा Realme फोन OPPO K13 5G, vivo T4x 5G, Motorola Edge 60 Stylus आणि realme 15x 5G सारख्या स्मार्टफोनला टक्कर देणार आहे.

Realme P4x 5G चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: या Realme फोनमध्ये स्मूथ गेमप्लेसाठी 90fps (फ्रेम्स प्रति सेकंद) असलेला 6.72-इंचाचा फुल एचडी रिझोल्यूशन डिस्प्ले आहे. फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 1000 निट्स पीक ब्राइटनेस देखील आहे.

चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या Realme फोनमध्ये MediaTek Dimensity 7400 अल्ट्रा प्रोसेसर देण्यात आला आहे.

Realme P4x 5G Antutu स्कोअर: कंपनीच्या अधिकृत साइटवरील माहितीनुसार या फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिपसेटचा Antutu स्कोअर 780K+ आहे.

रॅम आणि स्टोरेज: फोनमध्ये 8 जीबी रॅम आहे, परंतु व्हर्च्युअल रॅम वापरून तो 18 जीबी पर्यंत वाढवता येतो. याव्यतिरिक्त फोनमध्ये फोटो, व्हिडिओ आणि इतर स्टोरेजसाठी 256 जीबी स्टोरेज मिळते.

कॅमेरा: फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा सेकंडरी सेन्सर आहे. सेल्फीसाठी, हँडसेटमध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी: फोनला 45 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7000 एमएएचची पॉवरफुल बॅटरी दिली आहे. फोन रिव्हर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.