MRF ला टक्कर आता जमिनीवर सरपटला हा शेअर! 3.30 लाखाहून थेट इतका घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Share Market: अगदी काही महिन्यांपूर्वी देशभरातील गुंतवणूकदारांमध्ये हवा तयार करणाऱ्या या शेअरचा आता दम निघाला. लंबी रेस का घोडा म्हटला जात असलेल्या या शेअरमध्ये दोन लाखांची मोठी घसरण झाली. गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले. कोणता हा हा शेअर?

Share Market हे जोखीमचे मानले जाते. जितकी जास्त जोखिम तितका मोठा फायदा असे याचे गणित मानल्या जाते. जर तुमचा अंदाज बरोबर ठरला तर लॉटरी लागते नाही तर मग घरदार विकायची वेळ येते. त्यामुळेच शेअर बाजारात विचारपूर्वक आणि अभ्यास करूनच गुंतवणूक करण्याचा सल्ला वेळोवेळी देण्यात येतो. येथे पैसा गुंतवण्यापूर्वी तुमचा रिसर्च आणि आकडे बोलले पाहिजे. तरच तुम्ही या समुद्रात सहज पोहू शकता. काही शेअर तर गुंतवणूकदारांना मालामाल करतात. करोडपती करतात. तर काही नौका बुडवतात. सध्याचा हा शेअर त्याचेच मूर्तीमंत उदाहरण आहे. हा शेअर काही महिन्यांपूर्वी तेजीच्या लाटेवर स्वार होता. पण आता त्यात दोन लाखांची मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदार धास्तावला आहे. MRF कंपनीला टक्कर देणाऱ्या या शेअरचा आता दम निघाला आहे.
हा शेअर गेल्या काही महिन्यांपूर्वी मल्टिबॅगर ठरला होता. अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली. तर ज्यांचा अभ्यास होता. ज्यांनी रिसर्च केला होता. ते या शेअरपासून चार हात दूर होते. आता गेल्या 13 महिन्यात या शेअरचे मूल्य 2 लाख रुपयांनी घसरले आहे. ज्यांनी जास्त किंमतीला हा शेअर घेतला. त्यांचे जणू दिवाळेच निघाले आहे. MRF ला स्पर्धक ठरू पाहणाऱ्या या कंपनीचा शेअर आता ढासळला आहे.
13 महिन्यात शेअर 2 लाखांनी आपटला
तर या कंपनीचे नाव Elcid Investments Limited असं आहे. या शेअरची किंमत 3 लाख रुपयांपेक्षा अधिक होती. मात्र 13 महिन्यात या शेअरमध्ये 1.5 लाख रुपयांपेक्षा अधिकची घसरण झाली. 8 नोव्हेंबर 2024 रोजी एल्सिड इन्वेस्टमेंट्स लिमिटेडच्या एका शेअरची किंमत 3,30,473 रुपये इतकी होती. तर आता 5 डिसेंबर रोजी बाजार बंद झाल्यावर हा शेअर 1,29,501 रुपयांपर्यंत घसरला आहे. ही त्याची ऐतिहासिक घसरण मानल्या जात आहे. म्हणजे अवघ्या 13 महिन्यात या शेअरमध्ये दोन लाखांहून अधिकची घसरण दिसली आहे. हा शेअर जवळपास 60 टक्क्यांनी आपटला आहे. गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.
Elcid Investments Limited ही एक भारतीय नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे. ही कंपनी शेअर, डिबेंचर आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करते. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ही कंपनी नोंदणीकृत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (BSE) पण ही कंपनी नोंदणीकृत आहे. या कंपनीच्या मुराहर इन्वेस्टमेंट्स अँड ट्रेडिंग कंपनी लिमिटेड आणि सुप्तस्वर इन्वेस्टमेंट्स अँड ट्रेडिंग कंपनी लिमिटेड या दोन उपकंपन्या आहेत.
