पाण्यावर वसलेले सुंदर गाव, नावेतून करावा लागतो प्रवास, बाजारही नावेतून करावा लागतो…

Floating Village: तुम्ही पाण्यावर वसलेल्या व्हेनिस शहराबद्दल ऐकले असेल परंतू पाण्यावर वसलेले एक देखील प्रसिद्ध आहे. या गावात नावेतून बाजारहाट करावा लागतो. शिवाय बँक आणि मस्जित देखील नावेतच आहे. या अनोख्या गावाची माहीती जाणून घेऊयात...

पाण्यावर वसलेले सुंदर गाव, नावेतून करावा लागतो प्रवास, बाजारही नावेतून करावा लागतो...
| Updated on: Jun 01, 2025 | 6:17 PM

पाण्यावर वसलेल्या व्हेनिस शहराबद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असेल, परंतू पाण्यावर बांधलेल्या गावाबद्दल तुम्ही ऐकले आहे का? १९९५ मध्ये हॉलिवूड चित्रपट ‘वॉटर वर्ल्ड’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात संपूर्ण शहर पाण्यावर बांधलेले दाखवण्यात आले होते. असेच एक गाव आफ्रिकेतही आहे. ही झोपडी सदृश्य वस्ती बेनिनमध्ये आहे, या गावाचं नाव गॅन्व्ही (Ganvie) आहे. त्याला ‘आफ्रिकेचे व्हेनिस’ असे म्हटले जाते. येथील जलमार्गातून सुंदर बोटी चलविण्यात येतात,हे गाव व्हेनिससारखेच दिसते. परंतु प्रत्यक्षात येथील घरे इटलीच्या व्हेनिसपेक्षा खूपच वेगळी आहेत.

गॅन्व्ही हे आफ्रिकेचा एक देश बेनिनमधल्या कोटोनूजवळील नोकोई सरोवरावर वसलेले एक गाव आहे. बेनिनची राजधानी अबोमी येथे दोन राजवाडे आहेत, तेथे मानवी कवटीवर सिंहासन आहे. आपण जगातील विचित्र आणि रहस्यमयी ठिकाणांचा विचार केला तर हे तलावावर बांधलेले विचित्र गाव त्यापैकी एक आहे. येथे ३० हजारांहून अधिक गावकरी आहेत, जे बांबूपासून बनवलेल्या घरात राहतात. सर्व घरे लाकडाच्या आधारावर उभी आहेत. जरी हे शहर पाण्यावर वसलेले असले तरी पिण्याच्या पाण्याची येथे सर्वात मोठी समस्या आहे.

गावात या सुविधा उपलब्ध आहेत

पाण्यावर वसलेल्या गावात सोयी सुविधा नेहमीच्या गावांप्रमाणेच आहेत. येथे हाताने बनवलेल्या वस्तू विकल्या जातात. याशिवाय पाण्यावर तरंगणारा बाजार येथे भरत असतो. या टाऊनशिपमध्ये एका जमीनीवर गावातील मुलांसाठी शाळा बांधण्यात आली आहे. येथे एक बँक, पोस्ट ऑफिस, एक चर्च, एक मशीद तसेच वैद्यकीय सुविधा देखील आहेत. येथे स्मशानभूमीसाठी गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात माती आयात करावी लागते.

पर्यटकांमुळे होते कमाई

येथील बहुतांशी गावकरी लोक मासे पकडतात. याशिवाय, लोक येणाऱ्या पर्यटकांमुळे त्यांची कमाई होते. या भागातील मच्छीमार बांबू आणि जाळ्यांद्वारे विविध तंत्रांचा वापर करून मासेमारी करतात. अनेक गावकरी मैदानी भागात जमीन घेऊन दूभत्या जनावरांनाही पाळत आहेत. पाण्यावरच काही रेस्टॉरंट्स आहेत,तेथे ताजे मासे आणि भाताचे पदार्थ मिळतात. बोटींवरच फळे आणि भाज्या विकल्या जातात.